PNB, ICICI आणि BOI बँकेच्या ग्राहकांना धक्का!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नवी दिल्ली | नव्या वर्षात अनेक मोठे बदल होणार आहेत. मात्र अनेक बदल हे डिसेंबर (December) महिन्यात झाल्याचं पहायला मिळत आहेत. यामुळे सामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. एलपीजी, पीएनजी आणि सीएनजी च्या दरात वाढ होणार आहे. अशावेळी बँकेत कर्ज असणाऱ्यासाठी अजून एक डोकेदुखी देणारी बातमी समोर आली आहे.

कर्ज घेणं आता महाग होणार आहे. पंजाब बँक, आयसीआयसीआय बँक आणि बँक ऑफ इंडिया या बँकेनी निधी कर्जावर आधारित दराची किरकोळ किंमत वाढवण्यात आली आहे. बँकेच्या या निर्णयाची अमंलबजावणी (Implementation) 1 डिसेंबरपासून होणार आहे.

बँकेच्या या निर्णयामुळे कर्जावरील EMI आणि कर्जदेखील वाढण्याची शक्यता आहे. MCLR वाढल्यास त्यांचा थेट परिणाम गृहकर्ज (home loan), गाडी कर्ज आणि वैयक्तिक कर्जाच्या EMI वर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा बँकेत कर्ज असणाऱ्यासाठी ही मोठी चितेंची बाब ठरली आहे.

आयसीआयसीआय बँकेच्या(ICICI Bank) बेवसाईटने दिलेल्या वृत्तानुसार एका महिन्याच्या कर्जासाठी चे MCLR मध्ये पॉईंट 10 ने वाढ केली आहे. सध्याचा आयसीआयसीआय बँकेच्या MCLR दर 8.15 टक्के इतका आहे. जो पूर्वी 8.05 टक्के इतका होता.

PNB बँकेने एका वर्षाच्या MCLR 8.05 टक्क्यांपासून 8.10 टक्का वाढवला आहे. सहा महिन्याच्या कर्जाचा MCLR 7.75 टक्क्यावरुन 7.80 टक्के केला आहे. तर महिन्यासाठीचा MCLR 7.45 टक्क्यावरून 7.50 टक्के करण्यात आला आहे. तर तीन महिन्याच्या MCLR मध्ये 7.55 टक्क्यावरुन 7.80 वर केला आहे.

बँक ऑफ इंडिया या बँकेचा (Bank of India) एका वर्षाचा MCLR 7.15 टक्क्यावरुन 8.15 टक्के करण्यात आला आहे. सहा महिन्याचा 7.65 टक्क्यावरुन 7.90 तर तीन महिन्याचा 7.45 टक्क्यावरुन 7.70 इतका करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या