एलन मस्कच्या नवीन प्रोजेक्टबद्दल वाचून तुम्हीही थक्क व्हाल
मुंबई | टेस्लाचे सह-संस्थापक एलन मस्क(Elon Musk) हे नेहमीच चर्चेत येत असतात. ट्विटरच्या(Twitter) खरेदीच्या डीलपासून तर ते नेहमीच चर्चेत येत आहेत. आताही त्यांच्या एका नवीन प्रोजेक्टनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
एलन मस्क यांचा नवीन प्रोजेक्ट थक्क करणारा आहे. माणसांच्या डोक्यात चीप बसवून मेंदू कंट्रोल करण्यावर, त्यांचा प्रोजेक्ट सुरू आहे. यावर मस्क यांची न्युरालिंक ही कंपनी काम करत आहेत. या कंपनीन 2021 मध्ये या संदर्भात व्हिडीओ जारी केला होता.
नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून संशोधन सुरू आहे. माकडावर हा प्रयोग करण्यात आला आहे. माकडाच्या मेंदूत काॅम्प्युटरची चीप बसवण्यात आली होती. तसेच याच प्रकारची चीप डुकराच्या मेंदूतही बसवण्यात आली होती.
या चीप बद्दल सांगायचे तर ही चीप छोट्या नाण्याच्या आकाराची आहे. प्रयोग करताना चीपच्या माध्यमातून प्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत होते. हा प्रयोग यशाच्या मार्गावर आहे, अशी चर्चा आहे.
ही चीप मेंदूत टाकल्यानंतर मेंदू काॅम्प्युटरशी जोडला जाऊ शकतो. या चीपमुळं मेंदूंच्या हालचालींवर लक्ष ठेवणं शक्य होणार आहे. त्यामुळं मेंदूच्या संबधित आजारांवर निदान होऊ शकते. अल्झायमर, डिमेंशिया यांसारख्या आजारांवर निदान करण्यासाठी या चीपचा उपयोग होऊ शकतो, असा दावा न्युरालिंक कंपनीनं केला आहे.
दरम्यान, 2020 मध्येच माणसावर प्रयोग होणार होता, परंतु काही कारणांमुळं या चाचणीला उशीर झाला. परंतु आता या चीपचा माणसावर होणाऱ्या प्रयोगाकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
Comments are closed.