राम शिंदेंचा रोहित पवारांना मोठा धक्का!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांना धक्का देणारी एक बातमी समोर आली आहे. राम शिंदे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी रोहित पवारांवर गंभीर आरोप केला.

राम शिंदेंनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तब्बल 200 कार्यकर्त्यांना फोडत भाजपत सामील करुन घेतलं होतं. त्यानंतर त्यांनी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रविण घुले यांची भेट घेतली होती. घुले आणि राम शिंदे यांच्यात बंद दाराआड महत्त्वाची चर्चा झाली होती. त्यामुळे घुले भाजपात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.

राम शिंदे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे . महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कर्जत-जामखेडच्या प्रश्नावरुन भेट घेतली. काम सांगितल्यानंतर त्यांनी लगेच वेळ उपलब्ध करुन दिली. कर्जत-जामखेडच्या शिष्टमंडळासह मी आताच त्यांची भेट घेतली. त्यांना दोन कामं सांगितली, अशी माहिती राम शिंदे यांनी दिली.

मी याबाबत मागणी करताच मुख्यमंत्र्यांनी आठ दिवसांत प्रश्न सोडण्याचे आश्वासन दिलं. मुख्यमंत्र्यांनी 180 कोटींच्या पाणी पुरवठा आणि मलनिस्सारण योजनेवर तात्काळ सही केली. या योजनेच्या भूमीपूजनलाही मुख्यमंत्री येणार आहेत. हे मुख्यमंत्री तात्काळ काम करत आहेत. ते जनतेची कामं करत आहेत, असं राम शिंदे म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या-