शिंदे-फडणवीस सरकारला न्यायालयाचा मोठा दणका!

मुंबई | शिंदे-फडणवीस सरकारनं(Shinde-Fadnvis Goverment) महाविकास आघाडीचे आत्तापर्यंतचे अनेक निर्णय रद्द केले आहेत. या सरकारनं मुंबई महापालिका(Mumbai Muncipal Carporation)निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभागरचनेबाबत ठाकरेंनी घेतलेला निर्णयही रद्द केला होता. तसेच जुन्याच प्रभाग रचनेनुसार निवडणूका होणार असल्याचंही जाहीर केलं होतं.

शिंदे-फडणवीस सरकरानं ठाकरेंचा हा निर्णय रद्द केल्यानंतर, याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. याबाबत सर्वोच्च न्यायालयात दोन्ही गटाकडून युक्तिवाद करण्यात आला होता.

परंतु सर्वोच्च न्यायालयानं याबाबतचा निर्णय घेण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले होते. यानंतर ही याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली होती. याच याचिकेवर बुधवारी सुनावणी पार पाडली.

या सुनावणीत प्रभागरचनेच्या शिंदे सरकराच्या निर्णयाची अंमलबजावणी नको, असं मत मुंबई उच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. तसेच याबाबतची पुढील सुनावणी 20 डिसेंबरला होणार आहे. त्यामुळं पुढील सुनावणीकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, ठाकरेंनी प्रभाग रचनेची संख्या 227 वरून 236 केली होती. त्यावेळी शिवसेनेचा मित्र पक्ष असलेल्या काॅंग्रेस पक्षाने या निर्णयाला विरोध केला होता.

तसेच ठाकरेंनी तयार केलेली प्रभागरचना शिवसेनेच्याच फायद्याची आहे, असा आक्षेप घेत काॅंग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांनी, जुनीच प्रभागरचना अंमलात आणावी, अशी मागणी या सरकारकडं केली होती.

महत्वाच्या बातम्या-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More