रणवीर-दीपिकाच्या नवीन घराची किंमत ऐकून थक्क व्हाल

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | रणवीर सिंग(Ranveer singh) आणि दीपिका (Deepika Padukone)बाॅलिवूडमधील(Bollywood) एक लोकप्रिय कपल आहे. दोघांचेही आतापर्यंतचे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. त्यांचे सोशल मीडियावरही असंख्य चाहते आहेत.

रणवीर-दीपिका एकमेकांबद्दलचे प्रेम व्यक्त करण्याची संधी अजिबात सोडत नाहीत. रणवीर तर अनेक रिअॅलिटी शो आणि पुरस्कार सोहळ्यांमध्ये दीपिकाचे कौतुक करतो. तसेच तिच्यावर किती प्रेम आहे, हे बोलून दाखवतो. दीपिकाही सगळ्यांसमोर रणवीरवर असलेल्या प्रेमाची कबुली देत असते.

नुकतेच या दोघांनी मुंबईतील एका टाॅवरमध्ये अपार्टमेंट खरेदी केलं आहे. या अपार्टमेंटमधून समुद्र देखील दिसतो. या अपार्टमेंटची किंमत सुमारे 119 कोटी रूपये आहे. एक खास गोष्ट म्हणजे दीपिका-रणवीर आता, सलमान खान(Salman Khan) आणि शाहरूख खानचे(Shah Rukh Khan) शेजारी झाले आहेत.

या अपार्टमेंटचं बांधकाम अजून पूर्ण झालं नाही. परंतु याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नेटकरी आता कमेंट्स करत दोघांना शुभेच्छा देत आहेत. एका नेटकऱ्यानं तर हे घर बेबी येणार आहे, म्हणून घेतलं आहे, अशी कमेंट केली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी दीपिका-रणवीर वेगळे होणार, अशा चर्चांणा सोशल मीडियावर उत आलं होतं. परंतु एका कार्यक्रमात दोघांनी एकत्र आगमन केल्यानं, या सगळ्या अफवा असल्याचं स्पष्ट झालं आहे. तसेच यावरून दोघांचा सुखाचा संसार सुरू आहे, हे देखील स्पष्ट होतं आहे.

दीपिका आता लवकरच शाहरूख आणि जाॅन अब्राहमसोबत ‘पठाण’ या चित्रपटात झळकणार आहे. तसेच ‘रणवीर राॅकी और राणी की प्रेम कहानी’ या चित्रपटात दिसणार आहे.

महत्वाच्या बातम्या-