नवी दिल्ली | ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस (Pop Francis) यांनी सेक्सबाबत (Sex) एक वक्तव्य केलं आहे. ते सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरलं आहे.
डिस्ने प्रॉडक्शननं ‘द पोप आन्सर्स’ नावाची एक डॉक्युमेंटरी तयार केलीय. बुधवारी ही डॉक्युमेंटरी रिलीज झाली. गेल्या वर्षी पोप फ्रान्सिस यांनी 20 वर्षांच्या जवळपास 10 मुलांशी संवाद साधला होता. त्यावरच ही डॉक्युमेंटरी आधारित आहे.
देवानं माणसाला दिलेली सर्वांत सुंदर भेट म्हणजे सेक्स (Sex) असल्याचं पोप फ्रान्सिस यांनी डॉक्युमेंटरीत म्हटलंय. स्वतःला लैंगिकदृष्ट्या अभिव्यक्त करणं ही समृद्ध गोष्ट असते. त्यामुळे त्यापेक्षा वेगळी असणारी कोणतीही गोष्ट तुमची आणि तुमच्या लैंगिकतेची समृद्धता कमी करते, असं पोप यांनी म्हटलंय.
दरम्यान, गर्भपाताच्या मुद्द्यावरही त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं. धर्मगुरूंनी गर्भपात केलेल्या महिलांशी सहृदयतेनं वागलं पाहिजे. मात्र असं असलं तरी गर्भपाताच्या प्रथेचा स्वीकार करता येणार नाही, असंही ठामपणे ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या-