…तर मी 100 टक्के बारामतीमधून लोकसभा लढवेन- तृप्ती देसाई

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

पुणे | सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. कुठल्याही एखाद्या राजकीय पक्षाने मला उमेदवारी दिली तर मी 100 टक्के बारामती लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढेन. भाजपने मला विचारलं तर मी निवडणूक लढेनच, असं तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी म्हटलंय. त्या टीव्ही 9 मराठीशी बोलत होत्या.

आजच आम आदमी (AAP) पार्टीचे नेते त्यांच्या काही वरिष्ठ नेत्यांचा निरोप घेऊन मला भेटायला आले होते. आमच्या पक्षात प्रवेश करा, आम्ही तुम्हाला बारातमीतून लोकसभेची उमेदवारी देऊ, असं तृप्ती देसाईंनी (Trupti Desai) म्हटलंय.

अनेक पक्षांचे मला फोन येत आहेत. परंतु मी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा विचार घेऊनच पुढचा निर्णय घेणार आहे. आगामी काळात धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आणि घराणेशाही विरुद्ध लोकशाही अशीच निवडणूक होऊ शकते, असंही ते म्हणालेत.

दरम्यान, राज्यातल्या एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारचं काम ठिक सुरू आहे. खूप चांगलं काम चाललंय किंवा खूप वाईट काम सुरू आहे असं मी म्हणणार नाही, असं त्या म्हणाल्यात.

महत्त्वाच्या बातम्या-