Ravindra Berde | मरणापूर्वी ‘या’ गंभीर आजाराने त्रस्त होते रवींद्र बेर्डे

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ravindra Berde | दिग्गज कलाकार रवींद्र बेर्डे यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीवर दुखःचा डोंगर कोसळला आहे. वयाच्या 78 व्या वर्षी बेर्डेंनी मुंबई येथील टाटा रुग्णलयात अखेरचा श्वास घेतला. बेर्डे यांच्या अचानक जाण्याने मराठी सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

रवींद्र बेर्डे यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं. त्यांनी बाॅलिवूडमधील चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप पाडली होती. गेले अनेक वर्ष बेर्डे कर्करोगाशी झुंज देत होते.

बेर्डेंना कर्करोगाचं निदन-

गेल्या काही वर्षांपासून, रवींद्र बेर्डे (Ravindra Berde) कर्करोगाशी झुंज देत होते. त्यांना घशाचा कर्करोग झाला होता. बेर्डेंना जास्त त्रास होत असल्याने तातडीने त्यांना मुंबई येथील टाटा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. शिवाय दोन दिवसांपूर्वीच बेर्डेंना रुग्णालयातून घरी आणलं होतं.

बेर्डेंना हृदयविकाराचा झटका-

रवींद्र बेर्डे यांना 1995 मध्ये ‘व्यक्ती आणि वल्ली’ या नाटकादरम्यान हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर उपचार केलयानंतर 2011 मध्ये रवींद्र बेर्डे यांना कर्करोगाचं निदान झाल्याचं समोर आलं. बेर्डे यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत अनेक चित्रपटात एकत्र अभिनय केला होता. त्यांच्या निधनाने मराठी सिनेविश्वावर शोककळा पसरली आहे.

Ravindra Berde यांनी मराठी सिनेमात केलेलं काम

रवींद्र बेर्डे यांच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास त्यांनी एक गाडी बाकी आनाडी, खतरनाक, होऊन जाऊ दे, हमाल दे धमाल, चंगू मंगू, थरथराट, उचला रे उचला, धडाकेबाज, गंमत जंमत, झपाटलेला, भुताची शाळा, हाच सुनबाई चा भाऊ यांसारख्या गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं होतं. तर हिंदीत सिंघम सारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेली.

News Title : Ravindra Berde Was Suffering From This Disease
थोडक्यात बातम्या-

CAR | भारीच की! Tata पासून Maruti पर्यंत ‘या’ गाड्यांवर दीड लाखाचा डिस्काऊंट

Rinku Singhच्या बॅटमधून निघाला आग ओकणारा बॉल, Video पहाल तर थक्क व्हाल!

UPI द्वारे पेमेंट करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर!

Ravindra Berde | मराठी सिनेसृष्टीला धक्का; लक्ष्मीकांत बेर्डेंच्या सख्ख्या भावाचं निधन

Weather Update | डिसेंबर महिन्यात थंडी काय म्हणणार?, महत्त्वाची माहिती