खुल्लम खुल्ला प्यार… बाईकवरच सुरू झाला कपलचा रोमान्स, व्हिडीओ व्हायरल

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नवी दिल्ली | सध्या सोशल मीडियाने (Social media) तरुणांना चांगलंच वेड लावलं आहे. व्हिडीओ करणं आणि लाईक मिळवणं यासाठी तरुणाईचे प्रयत्न सुरु असतात. प्रसिद्धीसाठी अनेकदा नको ते प्रकार सोशल मिडियावर केले जातात. सध्या रिल्स बनवणं ही तरुणाईची क्रेज बनली आहे.

हल्ली अगदी लहान मुलांपासून ते फोनमध्ये काहीच न समजणाऱ्या वृद्धांना देखीन त्या रील्सने (Reels) वेड लावले आहे. अनेक वेगवेगळ्या प्रकारची स्टंटबाजी करण्याचा वेडापायी काहींना दुखापत देखील झाली आहे.

आपली बनवण्यात येणारी रील लवकरात लवकर व्हायरल (Viral) व्हावी यासाठी तरुणाई प्रयत्न करताना दिसत आहे. असाच एक प्रयत्न करणं एका कपलच्या चांगलंच अंगलट आलं आहे. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे.

विशाखापट्टणम (Visakhapatnam) येथील हा व्हिडिओ आहे. या व्हिडीओमध्ये एक 21 वर्षाचा तरुण मुलगा गाडी चालवत आहे. त्याचं गाडीवर त्यांची 19 वर्षाची गर्लर्फेंड बसली आहे. मात्र ही तरुणी चक्क त्या तरुणाच्या समोर बसली आहे. यामुळे गाडीला अपघात होण्याची शक्यता होती.

हा व्हिडीओ सोशल मिडियावर टाकण्यात आल्यानंतर तो काही वेळात व्हायरल झाला. तो व्हायरल झालेला व्हिडिओ पोलिसांच्या देखील लगेच नजरेत आला आणि पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई (action) केली आहे.

दरम्यान, त्या जोडप्याला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. तरुणाची गाडी जप्त करण्यात आली आहे. व्हायरल होण्यासाठी आणि रोमान्सच्या नावाखाली करण्यात आलेली ही स्टंटबाजी या जोडप्याला चांगलीच महाग पडली आहे.

महत्त्वाच्या बातम्या