खासदार राहुल शेवाळेंना न्यायालयाचा मोठा झटका!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | खासदार राहुल शेवाळेंच्या (Rahul Shewale) अडचणीत वाढ होणार असल्याचं दिसतंय. खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांचे दाऊदशी संबंध असल्याने त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप भालेकर यांनी केली आहे. याप्रकरणी त्यांनी न्यायालयाकडे एक तक्रार दाखल केली होती.

आता याप्रकरणी न्यायाधिश यांनी गंभीर दखल घेत या प्रकरणी तातडीने सरकारी वकिलांची नियुक्ती करण्यात यावी असे आदेशच राज्य सरकारला दिले आहेत.

कथित प्रेयसीसोबतचे व्हिडिओही समोर आले होते. पण, त्या महिलेचे संबंध दाऊदशी होते, तिने आपल्याला अडकण्याचा प्रयत्न केला, असा आरोप शेवाळेंनी केला. मात्र, याच आरोपांमुळे ते चौकशीच्या फेऱ्यात अडकणार आहेत.

दरम्यान, दिशा सॅलियन मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरेंचे नाव घेणारे खासदार शेवाळे स्वत: अडचणीत आले आहे. दिशाच्या मोबाईलवर AU नावाने अनेक फोन आले होते, आसा आरोप शेवाळे यांनी केला होता. तसेच AU म्हणजे आदित्य उद्धव असे बिहार पोलिसांच्या तपासात समोर आल्याचा दावाही त्यांनी केला होता.

महाराष्ट्रात हिवाळी अधिवेशन सुरु असतानाच राजकारण तापले होते. मात्र, आदित्य यांना अडचणीत आण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेवाळेंच्या त्यांच्याच जुन्या प्रकरणामुळे अडचणी वाढण्याची शक्याता निर्माण झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-