दिल्लीतील कांझावाला प्रकरण आहे तरी काय?, जाणून घ्या नेमकं काय घडलं?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नवी दिल्ली | दिल्लीतील कांझावाला येथे रविवारी पहाटे एका तरुणीचा मृतदेह विवस्त्र आढळून आला. शरीराचे अनेक भाग झाले होते. पोलिसांचा दावा आहे की, कारमध्ये आलेल्या 5 तरुणांनी एका तरुणीला धडक दिली, त्यानंतर तिला 10 ते 12 किमीपर्यंत फरफटत नेले, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला.

मृतदेह मिळाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी तपास केला असता, पोलिसांना घटनास्थळापासून काही अंतरावर एक स्कूटीही पडली होती, जी अपघातग्रस्त होती. स्कूटीच्या क्रमांकाच्या आधारे तरुणीची ओळख पटल असून आता प्रकरणात नवा खुलासा समोर आला आहे. येथे कांजवाला परिसरात मुलीला धडकून सुमारे 12 किलोमीटरपर्यंत खेचणाऱ्या कारने दुसऱ्या मुलीलाही धडक दिली.

पोलीस तपासात ही बाब नुकतीच समोर आली आहे. कळतं की, 1 जानेवारीच्या रात्री कांजवाला परिसरात दोन मुली स्कूटीवरून जात असताना एका कारमधील काही लोकांनी त्यांना धडक दिली.

टक्कर होताच दोन्ही मुली पडल्या, त्यात एका मुलीला थोडी दुखापत झाली आणि ती घाबरली आणि त्याचवेळी घराकडे धावली. त्याचवेळी दुसरी मुलगी कारच्या एक्सलमध्ये अडकली, त्यानंतर कारमधील लोक तिला अनेक किलोमीटरपर्यंत ओढत राहिले.

दरम्यान, या प्रकरणाची सध्या दिल्लीतच नाही तर देशभर चर्चा होत आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सीपी शालिनी सिंह यांनी काल या प्रकरणी माहिती दिली होती.

महत्त्वाच्या बातम्या-