समंथानं घेतलंय मुंबईत अलिशान घर; किंमत ऐकून व्हाल थक्क

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | साऊथ अभिनेत्री संमथा रूथ प्रभूनं (Samantha Ruth Prabhu)आपल्या अभिनयानं आणि सौंदर्यानं सर्वांची मन जिंकली आहे. आजपर्यंत तिनं यशोदा, माजिली यांसारखे अनेक सुपरहिट चित्रपट केले.

समंथा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणानं चर्चेत येत असते. गेल्या अनेक दिवसांपासून समंथा तिच्या आजारपणामुळं चर्चेत होती. परंतु सध्या तिची प्रकृती स्थिर आहे आणि तिचे अनेक चित्रपट लवकरच रिलीज होणार आहेत.

आता समंथा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे त्याचं कारण म्हणजे तिनं मुंबईत एक अलिशान घर खरेदी केलं आहे. तिनं सी फेसिंग थ्री बेडरूम फ्लॅट खरेदी केला आहे.

या अलिशान घरात समंथा लवकरच शिफ्ट होणार आहे, अशा चर्चा आहेत. या घराती किंमत तब्बल 15 कोटी रूपये आहे. सध्या या घराच्या किंमतीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

दरम्यान, मुंबईत घर घेतलं आहे अशी कोणतीही अधिकृत माहिती समंथानं दिलेली नाही. परंतु मीडियारिपोर्ट्सनुसार समंथानं मुंबईत अलिशान घर घेतलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-