मुंबई | प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी मोठा दावा केला आहे. यामुळे महाविकास आघाडीचं (Mahavikas Aghadi) टेंशन वाढलं आहे. 10 ते 15 आमदार पक्ष सोडणार असल्याची माहिती बच्चू कडू यांनी दिली आहे.
बच्चू कडूंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. 20- 25 आमदार इकडे-तिकडे झाले तरी सरकार (Goverment) मजबुतीने राहील, असं बच्चू कडू म्हणालेत.
येत्या 10 ते 15 दिवसांत आणि अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या अगोदर ही घडामोड होणार आहे. ठाकरे गटातील आमदार फुटण्याचा प्रश्नच राहिलेला नाही. कारण तेथून जे निघायचे होते, ते आधीच निघालेले आहेत, असेही ते म्हणाले.
शिवसेनेतील 40 आमदार फुटल्यानंतर ही मोठी घडामोड राज्यात होणार आहे. बच्चू कडू यांनी हा दावा केल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदारांकडे संशयाच्या नजरेने बघितलं जात आहे.
दरम्यान, बच्चू कडूंच्या दाव्यावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बच्चू कडू देखील शिंदे गटात प्रवेश करणार आहेत का, असा सवाल त्यांनी केलाय.
महत्त्वाच्या बातम्या-