चिंचवडमधून मोठी बातमी; ‘हा’ उमेदवार घेणार माघार?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | चिंचवड मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप(Laxaman Jagtap) यांचं निधन झाल्यानं या ठिकाणी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. ही पोटनिवडणूक २६ फेब्रुवारीला होणार आहे.

या पोटनिवडणुकीसाठी भाजपनं लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आश्विनी जगताप(Ashwini Jagtap) यांना उमेदवारी दिली आहे. तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे नाना काटे(Nana Kate) यांना अधिकृत उमेदवार जाहीर करण्यात आलं आहे.

परंतु ठाकरे गटाचे नेते राहुल कलाटे(Rahul Kalate) यांनी बंडखोरी करत पक्षाच्या निर्णयाविरोधात चिंचवड मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळं महाविकास आघाडीसमोर कलाटे यांचा उमेदवारी अर्ज अडचणीचा विषय ठरत आहे.

राहुल कलाटे यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी कलाटे यांची शिवसेना संपर्क प्रमुख सचिन अहिर यांनी भेट घेतली आहे. या भेटीनंतर राहुल कलाटे यांनी माध्यमांशी संवाद साधत त्यांचं मत मांडलं आहे.

माध्यमांशी बोलताना कलाटे म्हणाले की, मी या पोटनिवडणुकीतून अर्ज मागे घ्यावा यासंदर्भात पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा(Uddhav Thackeray) निरोप घेऊन सचिन आहिर मला भेटले. त्यानुसार मला उद्धव ठाकरेंचा अनादर करायचा नाही, पण मी माझ्या समर्थकांशी चर्चा करून अर्ज मागे घ्यायचा की नाही हे स्पष्ट करेन.

उद्धव ठाकरे आणि राहुल कलाटे यांच्यात फोनवरही चर्चा झाली आहे. त्यामुळं राहुल कलाटे काय निर्णय घेतील याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-