अदानींना मोठा झटका; बुडाले ‘इतके’ हजार कोटी

मुंबई | आठवड्याचे पहिले तीन दिवसात गौतम अदानी (Gautam Adani) किंवा अदानी ग्रुपला थोडासा दिलासा मिळाला असेल, पण गुरुवारी आणि आता शुक्रवारी अदानी ग्रुपला पुन्हा हादरे बसू लागले आहेत.

इंडेक्स प्रोव्हायडर एमएससीआयने अदानी (Adani) ग्रुपच्या चार कंपन्यांच्या वेटिंगमध्ये कपात करण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर कंपन्यांच्या शेअर्समध्ये पुन्हा घसरण पाहायला मिळत आहे.

अदानी गौतम अदानी यांची एकूण संपत्ती 55 हजार कोटी रुपयांनी म्हणजे 10 टक्क्यांहून अधिक घसरली आहे आणि दोन दिवसांत तो टॉप 20 मधून बाहेर पडला आहे.

इंडेक्स प्रदाता एमएससीआयने म्हटलं आहे की ते अदानी ग्रुपच्या चार कंपन्यांचे वजन कमी करेल, ज्यात प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसचा समावेश आहे.

अमेरिकन शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग रिसर्चच्या 24 जानेवारीच्या अहवालानंतर अदानी समूहावर स्टॉक मॅनिप्युलेशनचा आरोप करण्यात आला आहे.

अहवालानुसार, अदानी एंटरप्रायझेस व्यतिरिक्त, एमएससीआय अदानी टोटल गॅसचे वेटेज कमी करण्याचा विचार करत आहे. त्याचवेळी इंडेक्स प्रदाता समूहाच्या सिमेंट कंपनी ACC Ltd चे वेटेज देखील कमी करेल. या प्रकरणी अदानी समूहाकडून कोणतंही वक्तव्य करण्यात आलेलं नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More