“आदिलनं माझे न्यूड व्हिडीओ विकले”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | अभिनेत्री राखी सावंत(Rakhi Sawant) सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. कारण राखीचं वैवाहिक आयुष्य सध्या अडचणीत आलं आहे. काही दिवसांपूर्वी राखीनं तिचा पती आदिल खानचे(Adil Khan) एक्स्ट्रा मॅरेटीयल अफेअर असल्याचं माध्यमांसमोर सांगितलं होतं.

राखीनं आदिलवर फसवणूकीचा आणि मारहाणीचा आरोप करत पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली होती. त्यानंतर आदिलची चौकशी झाली आणि आदिलला अंधेरी न्यायालयानं १४ दिवसांची कोठडी सुनावली आहे.

त्यातच राखीनं आदिलवर अजून गंभीर आरोप केला आहे. आदिलनं आपले न्यूड व्हिडीओ काही लोकांना विकले आहेत, असा आरोप राखीन आदिलवर केला आहे. राखीनं हा खुलासा ई टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.

याबाबत आपण सायबर विभागात तक्रार केली आहे. तसेच या प्रकरणी सायबर पोलीस तपास करत आहेत, अशीही माहिती राखीनं दिली आहे. राखीनं आदिलबद्दल हा खुलासा केल्यानंतर सर्वांनाचा धक्का बसत आहे.

दरम्यान, राखीनं आदिलवर आपले पैसे आणि दागिने चोरल्याचा आरोपदेखील केला आहे. तसेच त्यानं आपल्याकडून दीड कोटी रूपये घेतल्याचंही राखीनं सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-