‘राजभवनाच्या बाहेर उभं राहून देता का शिव्या?’; संजय राऊतांचं शिंदे गटाला आव्हान
शिर्डी । शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे पुन्हा दौरे सुरु झाले. सहा महिन्यांनी तुरुंगाबाहेर आल्यावर ते पहिल्यांदाच आपल्या सहकुटुंबासोबत शिर्डी येथे आले आहेत.
यावेळेस त्यांनी तिथे पत्रकार परिषेद आयोजित केली होती. पत्रकारांशी बोलत असताना राऊतांनी शिंदे गटावर निशाणा साधत जोरदार टीका केली.
जर गद्दार आमच्या सारख्या निष्ठावंतांना शिव्या देत असतील तर उलट हा आमच्या निष्ठेचा विजय आहे. जर गद्दारांना शिव्याच द्यायच्या असतील तर राज्यात अनेक प्रकरण घडत आहेत त्यावर बोला. यांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे, असं संजय राऊत म्हणालेत.
आज आपल्या महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचा अपमान होत असताना त्यांनी किती लोकांना शिव्या दिल्या?, असा सवाल करत असतानाच शिव्या द्या ना. राज्यात शिवाजी महाराजांचा अपमान सुरु आहे. तुम्हाला संधी मिळाली आहे. तिथे शिव्या द्या. राजभवनाच्या बाहेर उभं राहून देता का शिव्या?, असं म्हणत राऊतांनी थेट शिंदे गटाला आव्हान दिल आहे.
महाराष्ट्र आणि कर्नाटक या गावांवरून होत असलेल्या वादावर सुद्धा राऊत यांनी त्यांचं मत व्यक्त केलं. ते म्हणाले की सीमाभाग लढा आणि शिवाजी महाराजांच्या अपमानावरून लक्ष विचलित करण्यासाठी हा वाद काढला आहे. या विषयावर महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य केलं नाही याकडेही संजय राऊतांनी लक्ष वेधलं.
थोडक्यात बातम्या-
राणा दा-पाठक बाईंच्या रिसेप्शन पार्टीची होतेय जोरदार चर्चा
शिंदे-फडणवीस सरकारला न्यायालयाचा मोठा दणका!
प्राजक्ताच्या ‘त्या’ पोस्टवर संतापले चाहते, म्हणाले तू पण…
उदयनराजेंचा रायगडावरून थेट इशारा, म्हणाले…
तरूणांसाठी गुड न्यूज; स्टार्टअपसाठी सरकार देतयं ‘इतक्या’ लाखांपर्यंतचं लोन
Comments are closed.