SBI च्या ‘या’ ग्राहकांसाठी आनंदाची बातमी!

SBI

SBI | शेतकऱ्यांना शेतीची कामे पूर्ण करण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळावे या उद्देशाने किफायतशीर व्याजदरात आणि सुलभ मार्गाने कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड योजना चालवली जात आहे. या योजनेद्वारे शेतकरी कमाल 7 टक्के व्याजदराने 3 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज घेऊ शकतात.

‘या’ ग्राहकांसाठी आनंदाची बातमी

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आणि पोस्ट ऑफिसमध्ये या योजनेअंतर्गत खाती उघडली जात आहेत. कर्जाची वेळेवर परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकार व्याजदरात 3 टक्के सूट देत आहे. अशा प्रकारे योजनेंतर्गत घेतलेल्या कर्जावर केवळ 4 टक्के व्याज द्यावे लागेल.

शेतकऱ्यांसाठी क्रेडिट कार्ड योजना ही अशीच एक योजना आहे, ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना अनेक फायदे मिळतात. किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कोणत्याही हमी किंवा सुरक्षेशिवाय 1.60 लाख रुपयांचे कर्ज दिले जाते.

SBI  | कार्ड बनवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल?

किसान क्रेडिट कार्डद्वारे शेतकऱ्यांना पीक विम्याची सुविधाही दिली जाते. याशिवाय अपंगत्व किंवा मृत्यू झाल्यास विमाही उपलब्ध आहे. किसान क्रेडिट कार्ड बनवण्यासाठी तुम्हाला जवळच्या बँकेत जावे लागेल, जिथे तुम्हाला एक अर्ज दिला जाईल. येथे तुम्हाला ओळखपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र यांसारखी कागदपत्रे विचारली जातील.

अर्जासोबत सर्व कागदपत्रे बँकेत जमा करा. यानंतर, सर्वकाही योग्य आढळल्यास आणि तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला क्रेडिट कार्ड जारी केलं जाईल.

दरम्यान, देशातील प्रत्येक शेतकऱ्याला किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ दिला जात आहे. अर्जासाठी 18 ते 75 वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘या’ राशीच्या लोकांच्या वैवाहिक सुखात होईल वाढ !, पाहा आजचं राशीभविष्य

आंदोलक महिलेचे मनोज जरांगेंवर गंभीर आरोप; राजकीय वर्तुळात खळबळ

विद्या बालन पाठोपाठ ‘या’ अभिनेत्रीची झाली ‘भूल भूलैया 3’ मध्ये एंट्री

सावधान! राज्यातील ‘या’ आठ जिल्ह्यांना बसणार अवकाळी पावसाचा फटका

‘धडा शिकवण्याची वेळ आलीये’; शरद पवारांनी केलं ‘या’ नेत्याला पाडण्याचं आवाहन

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .