Top News महाराष्ट्र मुंबई

“शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचा आंदोलनातील सहभाग म्हणजे निव्वळ ढोंगीपणा”

मुंबई  | कृषी कायद्याविरोधात गेल्या दोन महिन्यांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही शेतकरी आंदोलनात सहभागी होणार असल्याचं म्हटल जात आहे. यावर शरद पवारांचा सहभाग म्हणजे ढोंगीपणा असल्याच विरोधी पक्षनेते आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

मुंबईतील आझाद मैदानात येत्या 25 जानेवारी रोजी दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात शरद पवारही सहभागी होणार आहेत.

प्रजासत्ताक दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांना संबोधित करत असतात. त्याच्याच एक दिवस आधी शरद पवार शेतकरी आंदोलनात सहभागी होणार आहेत. त्यावरुन, पंतप्रधानांनी आपल्या भाषणात शेतकरी आंदोलनाची दखल घ्यावी, यासाठीची पवारांची ही खेळी असल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.

दरम्यान, विशेष म्हणजे या आंदोलनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही सहभागी होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येतं आहे.

थोडक्यात बातम्या-

“…मग शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्यात काय फरक राहिला??”

पुण्यात भाजपसाठी धोक्याची घंटा; ‘या’ कारणामुळे नगरसेवकांवर ठेवला जातोय वॉच?

मराठा आरक्षणावर आज होणार सुप्रीम कोर्टात सुनावणी!

प्रेमविवाह करणारांसाठी खूशखबर; उच्च न्यायालयानं दिला सर्वात मोठा निर्णय!

ठाकरे सरकार फक्त टक्केवारीत नंबर वन- अतुल भातखळकर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या