अजित पवारांच्या भेटीनंतर शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

पुणे | पुण्यात प्रतापराव पवारांच्या निवासस्थानी शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) संपूर्ण कुटुंबीयांसह दिवाळीनिमित्त एकत्र आले. यावेळी शरद पवारांनी (Sharad Pawar) दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

यावर्षी अजित पवार (Ajit Pawar) सत्तेत सहभागी झाल्यामुळे पवार कुटुंबाची एकत्र दिवाळी साजरी होणार की नाही याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. या कौटुंबीक सोहळ्यात शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवारही दाखल झाले. अखेर पवार काका आणि पुतण्या पुन्हा एकदा कुटुंबात एकत्र आले. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून अजित पवार डेंग्यूमुळे आजारी आहेत. मंत्रिमंडळ बैठक असो, प्रदूषण विषयक बैठक असोकिंवा अन्य कोणतेही शासकीय कार्यक्रम अजित पवार या बैठकांपासून दूर आहेत.

प्रतापरावांच्या घरी असलेल्या कार्यक्रमात अजित पवार आवर्जून उपस्थित होते. अर्थात या कार्यक्रमात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही हे सांगायला पवार कुटुंबातले कोणीच विसरले नाहीत. यावेळी शरद पवारांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

माणसाच्या आयुष्यात चढ उतार असतात, अडचणी असतात वेळप्रसंगी अडचणींना तोंड द्यावं लागतं पण काही दिवस संकटांचे विस्मरण करून कुटुंबासमवेत दिवस घालवावे लागतात, असंही पवार म्हणालेत.

दरम्यान, याआधीही अजित पवार आणि शरद पवार एकत्र आले होते.  पुण्यात 13  ऑगस्टला उद्योजक चोरडियांच्या निवासस्थानी एकत्र आले. ही बैठक तब्बल साडेतीन तास चालली होती.

महत्त्वाच्या बातम्या- 

उच्च न्यायालयाचा राज ठाकरेंना मोठा दिलासा!

पुन्हा जोरदार पाऊस कोसळणार; वाचा हवामान खात्याचा अंदाज

जरांगे मराठा मुलांच्या भल्यासाठी नाही, तर… काॅंग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याचा गंभीर आरोप 

शरद पवारांनी उपसलं हुमकी अस्त्र, अजित पवारांचं आता काय होणार?

भारत विरुद्ध नेदरलँड सामन्यासाठी मोठा बदल, ‘या’ मॅचविनर खेळाडूची संघात एन्ट्री!