गुड न्यूज! वयाच्या 48 व्या वर्षी शोएब अख्तर तिसऱ्यांदा झाला बाप

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Shoaib Akhtar | क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा आई-बाबा झाले आहेत. विराटनंतर आता पाकिस्तानचा प्रसिद्ध क्रिकेटपटूदेखील बाबा झाला आहे. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर (Shoaib Akhtar ) वयाच्या 48 व्या वर्षी तिसऱ्यांदा बाप झाला आहे.

शोएबची पत्नी रुबाब खान हिने 1 मार्च रोजी गोंडस मुलीला जन्म दिला आहे. तर विराटला वामिकानंतर मुलगा झाला आहे. विराट आणि अनुष्काने आपल्या लाडक्या लेकाचं नाव ‘अकाय’ असं ठेवलं आहे. आता शोएब अख्तरनेही चाहत्यांना ही गुड न्यूज दिली आहे.

शोएब अख्तर तिसऱ्यांदा बाप

शोएब अख्तर आणि रुबाब खान यांना तिसरी मुलगी झाली आहे. त्यांना दोन मुलं आहे. त्यांच्या पहिल्या मुलाचं नाव मोहम्मद मिकाइल अली आणि दुसऱ्या मुलाचं मोहम्मद मुजद्दिद अली असं आहे. शोएब (Shoaib Akhtar ) आणि रुबाब यांनी 2014 मध्ये संसार थाटला.

शोएबच्या घरी आता या चिमुकलीचं आगमन झालं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर सध्या शोएब अख्तर याच्या कुटुंबाची आणि नुकताच जन्मलेल्या लेकीची चर्चा रंगली आहे. शोएबला सोशल मिडियावर आता भरभरून शुभेच्छा दिल्या जात आहेत. माजी क्रिकेटपटूंनीही त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

शोएब अख्तरवर शुभेच्छांचा वर्षाव

1 मार्च 2003 चा दिवस शोएबसाठी खूप अविस्मरणीय ठरला होता. 1 मार्च 2003 मध्ये वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तानचा सामना झाला होता. तेव्हा पाकिस्तानने 50 षटकांत 273/7 अशी आव्हानात्मक स्कोर उभा केला होता.

याच सामन्यात शोएब अख्तरने (Shoaib Akhtar ) 10 षटकात 72 धावा देऊन एक विकेट घेतली होती. हा सामना भारताने आपल्या नावावर केला होता. आता 1 मार्चरोजीच शोएब अख्तर याच्या मुलीचा जन्म झाला. त्यामुळे सोशल मिडियावर 1 मार्च 2023 आणि 1 मार्च 2024 या दोन दिवसांबद्दल बोललं जातंय.कारण, हे दोन्ही दिवस शोएब साठी अत्यंत अविस्मरणीय ठरले आहेत.

News Title :  Shoaib Akhtar Welcomed Third Child At The Age Of 48

महत्त्वाच्या बातम्या-

महाशिवरात्रीचा उपवास करत असाल तर ‘या’ चूका करू नका

‘अशा’ व्यक्तींकडे कितीही कमावले तरी पैसे टिकत नाही!

धक्काबुक्की का झाली?; महेंद्र थोरवेंनी सांगितलं खरं कारण

अल्पवयीन मुलीसोबत घडला भयानक प्रकार, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

सावधान! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी