गौतम गंभीरने घेतला सर्वांत मोठा निर्णय!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Gautam Gambhir | क्रिकेटपटू गौतम गंभीर नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतो. आता त्याने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडेच मोठी मागणी केली आहे. त्याने (Gautam Gambhir) एक्सवर (पूर्वीचे ट्वीटर) यबाबत एक पोस्ट लिहिली आहे.

गौतम गंभीर आता राजकारणातून एक्जिट मारणार आहे. त्याने स्वतः पोस्ट करत याची माहिती दिली आहे. मी आता क्रिकेटवरच लक्ष्य केंद्रीत करु इच्छितो असं गौतम गंभीरने पोस्ट करत म्हटलं आहे. मला सगळ्या राजकीय जबाबदाऱ्यांमधून मुक्त करा, अशी मागणीच त्याने भाजप श्रेष्ठींकडे केली आहे.

गौतम गंभीरची पोस्ट

“मी आमचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांना विनंती केली आहे की, मला सगळ्या राजकीय जबाबदाऱ्यांमधून मुक्त करा. मी येणाऱ्या क्रिकेट सामन्यांवर लक्ष केंद्रीत करु इच्छितो. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मी ऋणी आहे. तसंच अमित शाह यांनीही मला जी संधी दिली आणि लोकांची सेवा करण्याची संधी दिली त्यासाठी मी त्यांचेही आभार मानतो. जय हिंद!”, अशी पोस्ट गौतम गंभीरने (Gautam Gambhir) केली आहे.

या पोस्टद्वारे त्याने राजकारणातून निवृत्ती घेतल्याचं म्हटलं आहे. गौतम गंभीर सध्या भाजपचा पूर्व दिल्लीचा खासदार आहे. त्याने 2019 मध्ये दिल्ली लोकसभा मतदारसंघातून मोठा विजय मिळवला होता. गंभीरने काँग्रेस उमेदवार अरविंदर सिंग लवली यांचा 3,91,222 मतांनी पराभव केला होता.

गौतम गंभीरचा राजकारणाला रामराम

गौतम गंभीर (Gautam Gambhir) हा T20 विश्वचषक 2007 आणि एकदिवसीय विश्वचषक 2011 मध्ये भारतीय संघाचा भाग राहिला आहे. त्याने दोन्ही स्पर्धांच्या अंतिम फेरीत भारतीय संघासाठी सामना जिंकणारी खेळी खेळली होती. टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात गंभीरने 54 चेंडूत 75 धावा केल्या होत्या.

यासोबतच एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात त्याने 91 धावा केल्या होत्या. गंभीर सध्या आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्सचा (KKR) मार्गदर्शक आहे. तो लखनौ सुपर जायंट्सचा मार्गदर्शकही राहिला आहे.

News Title :  Gautam Gambhir retirement from politics

महत्त्वाच्या बातम्या-

महाशिवरात्रीचा उपवास करत असाल तर ‘या’ चूका करू नका

‘अशा’ व्यक्तींकडे कितीही कमावले तरी पैसे टिकत नाही!

धक्काबुक्की का झाली?; महेंद्र थोरवेंनी सांगितलं खरं कारण

अल्पवयीन मुलीसोबत घडला भयानक प्रकार, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

सावधान! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी