केंद्र सरकारनं शेतकऱ्यांना दिली मोठी गुड न्यूज

नवी दिल्ली | केंद्र सरकारानं(Cental Goverment) शेतकऱ्यांना दिलासा देणारा एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळं शेतकऱ्यांचा फायदा तर होणारच आहे, पण वेळही वाचणार आहे. सरकारनं घेतलेल्या निर्णयामुळं शेतकऱ्यांचे पैसेही वाचणार आहेत. जाणून घेऊयात सरकारचा हा निर्णय नेमका काय आहे.

खतांसाठी आता शेतकऱ्यांना दुकानाच्या फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. कारण नुकतीच सरकरानं ई-काॅमर्स वेबसाईटच्या माध्यमातून कीटकनाशकांच्या विक्रीला परवानगी दिली आहे. सरकारच्या या निर्णयामुळं शेतकऱ्यांना घरबसल्या कीटकनाशके मिळू शकतात.

सरकारने कीटकनाशक विक्रीच्या नियमात बदल केला आहे. त्यानुसार ई-काॅमर्स वेबसाईटच्या माध्यमातून कीटकनाशक विक्रीला कायदेशीर मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी कीटकनाशके ऑर्डर केली की ती शेतकऱ्यांना घरपोच होणार आहेत.

सरकारने बदललेल्या नियमांनुसार, आता कंपन्या कायदेशीर पद्धतीनं कीटकनाशकांची विक्री करू शकतात. सरकारनं काही कंपन्यांनाच ही परवानगी दिली आहे. याचा मोठा फायदा या कंपन्यांनाही होऊ शकतो.

सध्या सरकारनं अॅमेझाॅन आणि फ्लिपकार्टला कायदेशीररित्या कीटकनाशकांची विक्री करण्याची परवानगी दिली आहे. तसेच या कंपनींकडे परवाना असणं अनिवार्य असणार आहे. तसेच या कंपन्यांना परवान्याचे सर्व नियम पाळणं बंधनकारक असणार आहे. या परवान्याची पडताळणी करण्याची जबाबदारी ई-काॅमर्सकडं देण्यात आली आहे.

सरकारच्या या निर्णयामुळं शेतकऱ्यांना एजंटला पैसे द्यावे लागणार नाहीत. त्यामुळं शेतकऱ्यांना कीटकनाशके स्वस्त दरात मिळू शकतात. तसेच शेतकऱ्यांचे दुकानात जाऊन रांगा लावण्याचे कष्टही वाचणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More