Dengue | काळजी घ्या! राज्यातून अत्यंत चिंताजनक माहिती समोर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Dengue | पावसाळा संपत आला की व्हायरल आजार पसरतात. व्हायरल आजारांमध्ये न्युमोनिया, इफेक्शन, डेंग्यू, (Dengue) टायफॉईड याचा समावेश असतो. डास चावल्याने होणाऱ्या डेंग्यूकडे वेळीच लक्ष दिलं नाही. तर तो रूग्णाचा जीवही घेऊ शकतो. अशात राज्यातून चिंताजनक बातमी समोर आली आहे. राज्यातील डेंग्यूचा (Dengue) प्रसारही वाढल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे. राज्यात दररोज दर तासाला सरासरी दोन रुग्णांना डेंग्यूची लागण होत असल्याचं समोर आलं आहे.

आरोग्य विभागाने नुकतीच आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार, देशभरातील रुग्णांच्या तुलनेत सात टक्के रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. त्यातील 4 हजार 300 रुग्ण हे मुंबईत आढळले आहेत. त्यामुळे मुंबईकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

1 जानेवारी ते 30 नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण देशभरात डेंग्यूचे 2 लाख 34 हजार 427 रुग्ण आढळले असून महाराष्ट्रात रुग्णांची संख्या 17 हजार 531 रुग्ण इतकी आहे. वर नमूद केल्याप्रमाणे उत्तर प्रदेशमध्ये डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण असून तेथे 33 हजार 075 रुग्ण आहेत.

बिहार दुसऱ्या स्थानवर असू त्या राज्यात एकून 19 हजार 672 रुग्णसंख्या असल्याची आकडेवारी आरोग्य विभागातर्फे जारी करण्यात आली आहे.

Dengue ची लक्षणे कोणती?

डेंग्यूची सर्वसाधारण लक्षणं म्हणजे अधिक तीव्रतेचा ताप (हाय ग्रेड फिवर), डोळे आणि डोके दुखी, अंगदुखी, अशक्तपणा, तोंडाला कोरड पडणे, उलट्या होणे, त्वचेवर लाल व्रण उठणे. ह्याव्यतिरिक्त कमी तीव्रतेची लक्षणं, जसे उचक्या लागणे, तळहात आणि तळपायांना खाज येणे, भूक कमी लागणे किंवा मळमळणे इत्यादी दिसून येऊ शकतात.

काय काळजी घ्याल?

पाणी बदलत राहा. पिण्याचे पाणी स्वच्छ राहील याची काळजी घ्या. प्यायचे पाणी नेहमी झाकून ठेवा.  आपल्या घराच्या आजूबाजूचा परिसर तसेच घरात झाडं असतील तर तिथे पाणी साठून राहणार नाही याची काळजी घ्या.

महत्त्वाच्या बातम्या- 

Vidyut Jamwal | ‘या’ अभिनेत्याने शेअर केले जंगलातील न्यूड फोटो!

Maratha Reservation | ‘…तर मी आमदारकीचा राजीनामा देईन’; ‘या’ आमदाराची मोठी घोषणा

Uddhav Thackeray | शिवसेनेच्या गोटातून मोठी बातमी समोर; ठाकरेंना पुन्हा धक्का

Weather Update | सुट्टीत फिरायचा प्लॅन करताय?, हवामान विभागाने दिला महत्त्वाचा सल्ला

Investment | मुलांच्या भविष्याचं असं करा प्लॅनिंग, वयाच्या विशीतच होईल करोडपती!