महाराष्ट्रात तब्बल इतका लाख कुणबी समाज होता?, अत्यंत महत्त्वाची माहिती समोर!

मुंबई | मराठ्यांना सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र ( Kunbi caste certificate ) देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील ( Manoj Jarange Patil ) बेमुदत आमरण उपोषणाला बसले आहेत. आज राज्य सरकारने न्या.संदीप शिंदे समितीचा प्राथमिक अहवाल स्वीकारला आहे. त्यानुसार ज्यांची कुणबी म्हणून नोंद होती. त्यांना राज्य सरकार कुणबी जात प्रमाणपत्र देणार आहे. उद्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.

न्या. संदीप शिंदे समितीने आतापर्यंत 1 कोटी 73 लाख 70 हजाराहून अधिक जुने दस्ताऐवज तपासले आहेत. तपासलेल्या कागदांमध्ये समितीला जवळपास 11 हजारांपेक्षा जास्त कुणबी मराठा नोंदी सापडल्या आहेत. समिती आणखी जुने दस्ताऐवज तपासण्याचे काम करत आहे. मात्र कुणबी समाजाच्या लोकसंख्येबाबत धक्कादायक अपडेट समोर आली आहे.

देशात शेवटची जातनिहाय जनगणना ब्रिटीश काळात झाली होती. ब्रिटीश सरकारने देशात 1881मध्ये जातनिहाय जनगणना केली होती. महाराष्ट्रात त्यावेळी 13 जिल्हे अस्तित्वात होते. या सगळ्या जिल्हामध्ये सुमारे 30 लाख 69 हजार 740 कुणबी मराठा समाज असल्याचा दावा ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांनी केला आहे. त्यांनी याबाबत अभ्यासपूर्ण संशोधन केलं आहे. याबाबतचा तपशील त्यावेळच्या ब्रिटीश गॅझेटमध्ये उपलब्ध आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

  1. “मला बीडला यायला लावू नका”, मनोज जरांगेंनी का दिला असा इशारा?
  2. आता आर या पार!; जरांगे पाटलांनी केली नवी घोषणा
  3. राज्यात मराठा आंदोलन पेटलं आणि भाजपचे हे नेते बघा कुठं फिरतायेत!
  4. कांद्यानं उडवला हाहाकार!; भाव ऐकाल तर म्हणाल, आधी उगाच विकला???
  5. ललित पाटील प्रकरणात नवा ट्विस्ट; पुणे पोलिसांवरील आरोपांनी खळबळ