मोठी बातमी- हिंसाचारामागचा मास्टरमाईंड कोण?, नितेश राणेंचा गौप्यस्फोट

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | महाराष्ट्रात गेले काही दिवस मराठा आरक्षणामुळे वातावरणात तणाव निर्माण झाल्याचं चित्र पहायला मिळतंय. मनोज जरांगे पाटलांनी आमरण उपोषण सुरु केल्यानंतर राज्यात ठिकठिकाणी साखळी आंदोलन सुरु आहे. मराठा समाजच नाही, तर अनेक राजकीय नेत्यांनी सुद्धा जरांगेंना पाठिंबा दिला आहे.

मराठा आरक्षणाविषयी माध्यमांशी बोलत असताना भाजप (BJP) नेते आणि आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी याबाबत वक्तव्य केलं आहे. याआधी मराठा समाजाने 58 मूकमोर्चे काढले. त्यावेळी त्यांनी वेगळाच इतिहास रचला. शिवाय यावेळी कुठेही अनुचित प्रकार घडला नाही किंवा गालबोट लागलं नाही.

मनोज जरांगे पाटील गेले 7 दिवस आपल्या मागणीसाठी शांततेत उपोषण करत आहेत. मात्र राज्यात आताच हिंसक परिस्थिती कशी काय निर्माण झाली?. मराठा बांधवाना जरांगे पाटील वारंवार आवाहन करत आहेत. शांततेत आंदोलन करा, असं वारंवार सांगत आहेत, नाही तर मी वेगळा निर्णय घेईल असंही ते म्हणाले आहेत.

मनोज जरांगेंच्या (Manoj Jarange) आंदोलनात अदृश्य शक्ती घुसली आहे. त्यासोबतच मराठा आंदोलन आणि समाजाला बदनाम करण्याचं काम सुरू आहे. सरकार आरक्षणावर काम करत असताना कोणाला दंगल हवी आहे?, हे सगळं कोण घडवतंय?. महाराष्ट्रातील हिंसक परिस्थितीचा मास्टरमाईंड कोण? तिकडे संजय राऊत असतील किंवा सुप्रिया सुळे किंवा महाविकास आघाडीचं अन्य कोणी हे लवकरच समजेल असं राणे म्हणाले.

थोडक्यात बातम्या-