मुंबई | राज्यभरातही मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांत जमावाकडून आमदारांचे बंगले लक्ष्य केले जात आहेत. सोमवारी बीडमध्ये (Beed) आमदार प्रकाश सोळंके (Prakash Solanke) आणि आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांच्या निवासस्थानाला आग लावण्यात आली. यानंतर गृहविभाग अलर्ट मोडवर गेलं असून त्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. गृहखात्याने राजकीय नेत्यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे.
राज्यातील नेत्यांच्या घराबाहेर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. आरक्षणासाठी मराठा आंदोलक आक्रमक झाले असून आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अर्जुन खोतकरांच्या जालन्यातील घराची सुरक्षा वाढवली आहे.
भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या कोल्हापुरातील निवासस्थानी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. अजित पवार, नारायण राणेंसह सर्वच महत्वाचे मंत्री आणि नेत्यांच्या घरांभोवती पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
मराठा आंदोलकांनी नेत्यांच्या घरांवर हल्ला चढवला आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील नेत्यांच्या घराबाहेर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
- “असं कुठं आरक्षण मिळतं का?”, मराठा आरक्षणाविरोधात ‘या’ अभिनेत्रीची थेट पोस्ट
- “त्या लोकांना सोडणार नाही!”, देवेंद्र फडणवीसांनी दिला सज्जड इशारा
- “मला बीडला यायला लावू नका”, मनोज जरांगेंनी का दिला असा इशारा?
- आता आर या पार!; जरांगे पाटलांनी केली नवी घोषणा
- राज्यात मराठा आंदोलन पेटलं आणि भाजपचे हे नेते बघा कुठं फिरतायेत!