अजित पवारांच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट, डॉक्टर म्हणाले…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची तब्येत बिघडली आहे. त्यांना चार-पाच दिवसांपासून डेंग्यूची (Dengue) लागण झाल्याची माहिती आहे. आता त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर संजय काकोटे यांनी अजित पवारांच्या (Ajit Pawar) प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे.

अजित पवार यांना गेल्या पाच दिवसांपासून डेंग्यूची लागण झालीय. अजित दादांना गेल्या चार-पाच दिवसांपासून डेंग्यूची लागण झाली होती. एनएसवन टायटन स्ट्राँगली पॉझिटिव्ह आहे. आतासुद्धा त्यांना 101 इतका ताप आहे, असं डॉक्टरांनी सांगितलं.

आम्ही उद्या प्लेटलेट्स चेक करणार आहोत. त्यात विशेष काही सापडलं तर आम्ही एखाद वेळेस रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेऊ. त्यांना सध्या तरी सलाईन आणि इतर औषधी चालू आहेत. त्यांना प्रचंड थकवा आलाय. त्यामुळे त्यांना विश्रांतीची खूप गरज आहे, असंही डॉक्टरांनी सांगितलंय.

उद्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही तर रुग्णालयात दाखल करावं लागेल, असं डॉक्टरांनी सांगितलं. प्लेटलेट्स चेक करून रुग्णालयात दाखल करण्याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे, असं डॉक्टरांनी सांगितलंय. सध्या अजित पवारांना त्यांच्या घरीच सलाईन लावली आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-