मुंबई | मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला अल्टीमेटम दिला. जरांगे यांनी पत्रकार परिषदेत थेट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. सरकारच्या धमक्यांना घाबरणार नाही. अंगावर आल्यावर सोडणार नाही, असा इशारा जरांगे यांनी दिला.
किती दिवसात मराठा आरक्षण देणार ते सांगा, त्रास दिल्यास जशास तसं उत्तर देणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. तसेच जरांगे पाटील यांनी दोन उपमुख्यमंत्र्यांपैकी एक अधिक जबाबदार राहतील. एकाला काड्या करण्याची जास्त सवय असल्याची घणाघाती टीकाही मनोज जरांगे पाटील यांनी केली.
सरकारकडे आपण सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली होती. मात्र, त्यांनी फक्त ज्यांच्याकडे नोंदी असतील अशांनाच प्रमाणपत्र देणार असल्याचे म्हटले आहे. सरकारची ही भूमिका चुकीची असल्याचं त्यांनी सांगितलं. सरकारने मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवावं, त्याबाबतचा निर्णय घेण्यासाठी सरकारकडे आजची रात्र आणि उद्याचा दिवस असल्याचे मनोज जरांगे यांनी म्हटलंय.
अमित शहा यांना माझा नंबर द्या, मी त्यांना सांगतो राज्यातील परिस्थिती अत्यंत बेकार आहे ते,असं मनोज जरांगे यांनी म्हटलं. पण अमित शाह यांना फक्त फडणवीसांना फोन लावता येतो असं म्हणत मनोज जरांगे यांनी फडणवीसांवरही निशाणा साधला.
महत्त्वाच्या बातम्या-
- “असं कुठं आरक्षण मिळतं का?”, मराठा आरक्षणाविरोधात ‘या’ अभिनेत्रीची थेट पोस्ट
- “त्या लोकांना सोडणार नाही!”, देवेंद्र फडणवीसांनी दिला सज्जड इशारा
- “मला बीडला यायला लावू नका”, मनोज जरांगेंनी का दिला असा इशारा?
- आता आर या पार!; जरांगे पाटलांनी केली नवी घोषणा
- राज्यात मराठा आंदोलन पेटलं आणि भाजपचे हे नेते बघा कुठं फिरतायेत!