‘असं वागल्यावर काय घंट्याचं परत पंतप्रधान होतील’; जरांगे भडकले

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

जालना | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit shaha) यांनी देवेंद्र फडणीस (Devendra Fadnavis) यांना फोन करुन महाराष्ट्राच्या परिस्थितीचा आढावा घेतलाय. यावर बोलताना मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) निशाणा साधला. तसेच फडणवीसांना देखील सुनावलं.

मार्ग काढू, चर्चा करु, असं बोलता येत नाही. राज्य चालवायला निघाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना डबल पंतप्रधान होतील, असं स्वप्न बघत आहेत. असं वागल्यावर काय घंट्याचं होतील का?. एवढ्या मोठ्या नेत्याने काय बोलावं, केसेस शिवाय काही बोलतच नाहीत. आमच्या मराठ्यांच्या डोक्यावर जेवढे केस आहेत तेवढे केसेस आहेत. अमित शाहांनी इतर सर्वांना सोडून दिलं आणि त्यांनाच फोन करतात. त्यांच्याकडे काय आहे. त्यांनी सर्व इचको करुन ठेवलाय. तुमचाही इचको होईल. मग तुम्हाला घरी जावं लागेल, असं जरांगे म्हणालेत.

सरकारला दुसरं काय कामच आहे? हे असे बांगड्या भरल्यागत चाळे करायचे. यांच्या हातात बांगड्या पाहिजे होत्या. हे मर्दासारखं चालवतच नाहीत. आतून काड्या करतात. सरळ सांगायचं, कुठे नेट बंद करता तर कुठे काय बंद कर. आमच्या अंगावर यायचा प्रयत्न केला, तुम्ही आमच्याकडे दांडकं घेऊन येत असाल तर आम्हालासुद्धा मर्यादा आहेत. आम्हाला आमच्या मर्यादा सोडाव्या लागणार आहेत आणि याला जबादार दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री असणार आहेत. त्यातला एक उपमुख्यमंत्री तर जास्त जबाबदार राहणार आहे. कारण त्याला असल्या काड्या करायची लयी सवय आहे, अशी टीका मनोज जरांगे यांनी केली.

आमचा मराठ्यांचा नाईलाज आहे. आम्ही उद्या संध्याकाळपर्यंत वाट पाहू. नाहीतर पाणी सोडणार. आमचं आंदोलन शांततेत करु. तुम्ही किती ताकदार आहात, किती गुन्हे दाखल करतात ते आम्हाला बघायचं आहे, असं जरांगे म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या-