“…हे असे बांगड्या भरल्यागत चाळे करायचे, यांच्या हातात बांगड्या पाहिजे होत्या”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

जालना | सरकारला दुसरं काय कामच आहे? हे असे बांगड्या भरल्यागत चाळे करायचे. यांच्या हातात बांगड्या पाहिजे होत्या. हे मर्दासारखं चालवतच नाहीत. आतून काड्या करतात. सरळ सांगायचं, कुठे नेट बंद करता तर कुठे काय बंद कर. आमच्या अंगावर यायचा प्रयत्न केला, तुम्ही आमच्याकडे दांडकं घेऊन येत असाल तर आम्हालासुद्धा मर्यादा आहेत. आम्हाला आमच्या मर्यादा सोडाव्या लागणार आहेत आणि याला जबाबदार दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री असणार आहेत, असं मनोज जरांगेंनी (Manoj Jarange) म्हटलंय. ते अंतरवाली सराटीमध्ये बोलत होते.

बीडमध्ये मराठा आंदोलकांनी काल जाळपोळ केली. त्यामुळे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गृहमंत्री म्हणून जाळपोळ करणाऱ्यांना विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल होईल, असा इशारा दिला. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केसेस दाखल करण्याबाबत केलेल्या वक्तव्यावर मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी सडकून टीका केली.

भाजप तुमच्यामुळेच संपायला लागली आहे ना मग, कशामुळे संपायला लागली आहे? रिवाज कशामुळे इतक्या राज्यात आलेत? हे असले नमुने आहेत ना बढाया हाणणारे. निधी आमचा आहे. कर आमच्या जनतेचा आहे. फुकटचे पैसे खायचे. बासुंद्या खाय, गुलाबजामून खाय. फुकट खायचं, आता सूचना. उगाच बोलायचं की कलम 307 लागू करायचं, असं ते म्हणालेत.

तुम्ही राज्यात अशांतता पसरवायचं ठरवलं आहे तर करा तुम्हाला काय करायचं ते. आमचा मराठ्यांचा नाईलाज आहे. आम्ही उद्या संध्याकाळपर्यंत वाट पाहू. नाहीतर पाणी सोडणार. आमचं आंदोलन शांततेत करु. तुम्ही किती ताकदार आहात, किती गुन्हे दाखल करतात ते आम्हाला बघायचं आहे, असंही ते म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या-