कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून ‘ही’ नावं चर्चेत?
पुणे | कसबा मतदार संघावर गेली तीन दशके भाजपचे वर्चस्व आहे. मुक्ता टिळक (mukta tilak)यांच्या निधनामुळे या मतदार संघात 27 फेब्रवारी रोजी निवडणूक होत आहे. यामुळे भाजप टिळक परिवारा उमेदवारी देणार का?
चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यासाठी कोथरुड मतदार संघ सोडणाऱ्या मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी देणार? हा निर्णय अजून झालेला नाही. या दरम्यान मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांची प्रतिक्रिया आली आहे.
जर पक्षाने संधी दिली तर मी ही निवडणूक लढवण्यास तयार आहे. मी अनेक वर्ष मुक्तांसोबत काम केलेल आहे. माझा मुलगाकुणाल देखील चांगलं काम करत आहे. त्यामुळे परिवारात उमेदवारी मिळावी, अशी आमची इच्छा असली तरी पक्षाचा निर्णय आम्हाला बांधील राहिल, असं ते म्हणालेत.
भाजपची तयारी सुरु असताना महाविकास आघाडीतून काँग्रेसने कसबा मतदार संघासाठी दावा केला आहे. दोन वेळा काँग्रेसचे उमेदवार विजयी झाल्याचा दाखला दिला जात आहे.
काँग्रेसकडून माजी नगरसेवक अरविंद शिंदे, रवींद्र धंगेकर, कमल व्यवहारे यांची नावे पुढे आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडूनही या मतदार संघावर दावा केला जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
Comments are closed.