शेअर मार्केटमध्ये होणार ‘हा’ मोठा बदल

नवी दिल्ली | भारतातील अनेक लोक शेअर मार्केट (share market) मध्ये गुंतवणूक करत असतात. मात्र नुकताच शेअर मार्केटमधील काही नियमांमध्ये एक बदल करण्यात आला आहे. हा करण्यात आलेला बदल 27 जानेवारीपासून लागू होणार आहे.

भारतीय इक्विटी मार्केट (Equity Market) 27 जानेवारीला पूर्णपणे लहान हस्तांतरण चक्राकडे वळणार आहे. याला T+1 सेटलमेंट म्हणतात. हा नियम लागू झाल्यानंतर विक्रेत्याच्या आणि खरेदीदाराच्या खात्यात पैसे मिळवण्याची परवानगी दिली जाईल. हे पैसे खातेधारकाच्या खात्यात 24 तासांत जमा होऊ शकतात.

आता तु्म्ही तुमच्या पोर्टफोलिओमधील शेअर विकल्यास 24 तासांत त्यांचे पैसे तुम्हाला मिळणार आहेत. सगळ्या मोठ्या कंपन्या आणि ‘ब्लू चिप’ कंपन्या 27 जानेवारीला T+1 मध्ये स्विच करतील. या नियमामुळे बाजारात हालचाली वाढतील.

सध्या मार्केटमध्ये T+2 चा नियम लागू आहे. या नियमानुसार पोर्टफोलिओमधील शेअर विकल्यास 48 तासांत पैसै खात्यात जमा होत असत. 2003 साली हा नियम लागू करण्यात आला होता. आता दोन दशकांनतर हा नवीन सेटलमेंट नियम लागू करण्यात आला आहे.

या नियमामुळे बाजारात अधिक पैसा उपलब्ध होईल. यामुळं मार्केटमध्ये पैसा वाढेल. तज्ञांच्यामते अधिक पैसा उपलब्ध झाल्यास गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री करु शकतील. ज्यामुळं बाजाराचे प्रमाण वाढेल.

महत्त्वाच्या बातम्या

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More