येत्या काही तासांत ‘या’ ठिकाणी पावसाची शक्यता

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळं तिथं चक्रिवादळ निर्माण झालं आहे. या चक्रिवादळाचा महाराष्ट्रावरही परिणाम होण्याचा अंदाज हवामान खात्यानं(Meteorology Department) वर्तविला आहे.

भारतीय हवामान विभागानं दक्षिण आंद्र प्रदेश, उत्तर तामिळनाडू आणि पुद्दुचेरी येथे चक्रिवादळाचा इशारा दिला होता. परंतु आता या वादळाचा महाराष्ट्रावरही परिणाम होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची(Rain Update) शक्यता आहे, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तविला आहे. पुढच्या 24 ते 48 तासांत म्हणजेच पुढील एक-दोन दिवसांत हा पाऊस पडू शकतो.

मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागांत जोरदार वाऱ्यासह हा पाऊस पडू शकतो, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. त्यामुळं सर्वांनी सतर्क रहावे.

चक्रिवादळामुळं होणाऱ्या अवकाळी पावसात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होऊ शकतं. त्यामुळं महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्यानं बळीराजा चिंतेत आला आहे.

महत्वाच्या बातम्या-