Weather Update | काळजी घ्या! राज्याच्या ‘या’ भागात थंडी वाढणार… हवामान खात्याचा मोठा अलर्ट

Weather Update | राज्यात महिन्याच्या (Weather Update) पहिल्या आठवड्यापासून थंडीने डोकं वर काढलं आहे. राज्याच्या काही भागात झपाट्याने थंडी वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर हवामान विभागाने महत्त्वाची माहिती दिली आहे.

हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सध्या किमान तापमानाचा पारा खाली घसरत असताना पहायला मिळत आहे. मात्र, किमान तापमान डिसेंबरमध्ये असायला पाहिजे तसं त्या पातळीवर दिसत नाही किंवा अजूनही त्या पातळीवर आलेले नाही, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

राज्यात थंडी वाढणार-

देशाच्या उत्तरेकडील भागात थंडीत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे, त्यामुळे विदर्भात देखील किमान तापमानाचा पारा खाली घसरल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. वातावरणात बदल पाहता आता खऱ्या अर्थाने हिवाळा सुरू झाल्याचं चित्र पहायला मिळत आहे.

मराठवाड्यात थंडीचा मुक्काम-

महाराष्ट्राच्या अनेक भागात थंडी सुरु झाली आहे. उर्वरित आठवड्यातही थंडी कायम राहील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर दुसरीकडे विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे.

तापमानात घट-

विदर्भात किमान तापमान 15 अंश सेल्सिअस खाली गेले असून सर्वाधिक उष्ण असणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यात किमान तापमानाचा पारा 13 अंश सेल्सिअसवर गेल्याचे पहायला मिळाले.

सध्याच्या थंडीचे किमान तापमान सरासरीपेक्षा अधिकच आहे. डिसेंबरमधील थंडी ह्याच पातळीत राहील असे वाटते. सध्याचे महाराष्ट्रातील तापमान वेगवेगळ्या भागात 15 ते 17 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे, म्हणजे ते सरासरीपेक्षा 2 अंश सेल्सिअसने अधिक आहे.

News Title : weather update winter season increase

थोडक्यात बातम्या-

देवेंद्र फडणवीसांचा (Devendra Fadnavis) पत्ता कट?, राज्यात भाजपचं सरकार आलं तर ‘हे’ नेते होऊ शकतात मुख्यमंत्री

Bollywood News | ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चनच्या घटस्फोटाबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट

Parliament | आताची सर्वात मोठी बातमी! लोकसभेत घडला धक्कादायक प्रकार

Ravindra Berde | मरणापूर्वी ‘या’ गंभीर आजाराने त्रस्त होते रवींद्र बेर्डे

कुटुंबात प्रॉपर्टीवरुन वाद?; Amitabh Bachchan यांनी उचललं मोठं पाऊल