Rohit Shetty | चित्रपट निर्माता रोहित शेट्टीने (Rohit Shetty) चाहत्यांना या नवीन वर्षात मोठी खुशखबर दिली आहे. त्याने ‘गोलमाल’ चित्रपटाबाबत मोठी घोषणा केली आहे. त्याची ‘इंडियन पोलिस फोर्स’ (Indian Police Force) ही वेबसिरिज लवकरच रिलीज होणार आहे. यात अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा, शिल्पा शेट्टी आणि विवेक ओबेरॉय दिसणार आहेत. या वेब सिरिजसाठी रोहित शेट्टी जोरदार प्रमोशन करत आहेत.
त्याने या वेब सिरिजच्या प्रमोशनवेळीच एक मोठी घोषणा केली आहे.रोहित शेट्टीने ‘गोलमाल 5’ चित्रपटाची घोषणा केली आहे. यासोबतच चित्रपट नेमका कधी येणार याचाही खुलासा त्याने केला आहे. तसेच हा चित्रपट त्याच्या इतर चित्रपटांपेक्षा मोठा असणार असल्याचेही रोहित म्हणाला.
रोहित शेट्टीने केली मोठी घोषणा
“गोलमाल 5 (Golmaal 5 movie) चित्रपट लवकरच बनेल. मला वाटतेय की, यावर मी लवकर काम करायला पाहिजे. येणाऱ्या दोन वर्षांत गोलमालचा पाचवा पार्ट पूर्ण होईल. हा चित्रपट माझ्या इतर चित्रपटपेक्षा नक्कीच मोठा असणार आहे. मोठा असणार म्हणजेच मी यात अॅक्शन नाही घेऊ शकत. पण, यात जॉनरचा वापर पुरेपूर असणार आहे.”, असे रोहित शेट्टी (Rohit Shetty) एका मुलाखती दरम्यान म्हणाला.
तसेच पुढे तो म्हणाला की, “आताचे सिनेमे हे ‘ऑल द बेस्ट’ आणि ‘गोलमाल’ पेक्षा मोठे असायला हवेत. मला आता ‘चेन्नई एक्सप्रेस’ सारखे चित्रपट बनवायची इच्छा होत आहे. मला अशी चांगली कथा मिळाली तर, मी नक्कीच एक नवा चित्रपट बनवेल.”, त्यामुळे चाहत्यांना लवकरच चेन्नई एक्सप्रेसचाही नवा पार्ट दिसण्याची शक्यता आहे.
लवकरच येणार ‘गोलमाल 5’
रोहित शेट्टीने (Rohit Shetty) गोलमाल चित्रपटाचे चार भाग काढले आहेत. पहिल्या चित्रपटात अभिनेता अजय देवगन (गोपाल), अर्शद वारसी (माधव), शर्मन जोशी (लक्ष्मण प्रसाद), तुषार कपूर (लकी) आणि रिमि सेन हीने निरालीची भूमिका साकारली होती. तर, दुसऱ्या आणि तिसऱ्या पार्टमध्ये करीना कपूर मुख्य भुमिकेत होती. चौथ्या पार्टमध्ये परिणीत चोप्रा मुख्य भुमिकेत होती.
आता पाचव्या पार्टमध्ये रोहित शेट्टी कोणत्या अभिनेत्रीला घेणार याबाबत चाहत्यांना उत्सुकता असणार आहे. रोहित सध्या त्याच्या आगामी ‘इंडियन पोलिस फोर्स’या वेबसिरिजमुळे चर्चेत आहे. तसेच, ‘सिंघम 3’ च्या शूटिंगमध्येही तो सध्या व्यस्त आहे.
News Title- Rohit Shetty big announcement Golmaal Cinema
महत्वाच्या बातम्या-
Vivah Muhurta 2024 l लग्नाळुंसाठी नवं वर्ष जाणार आनंदाचं! जाणून घ्या 2024 मधील विवाह मुहूर्त
Virat Kohli l शून्यावर आऊट झाला विराट कोहली, मात्र कोहली नसता तर भारत हरला असता, कारण…
SIP Tips to Invest l SIP मध्ये गुंतवणुकीचा विचार करताय? मग त्याआधी या गोष्टी लक्षात घ्या