Ram Mandir Inauguration Day | अखेर 500 वर्षांची प्रतिक्षा संपून आज तो दिवस उजाडला आहे. संपूर्ण देशाचं लक्ष लागलेला ऐतिहासिक राम मंदिर उद्घाटन सोहळा आज (22 जानेवारी) अयोध्येमध्ये होणार आहे. श्रीरामलल्ला आपल्या भव्य दिव्य मंदिरात आज विराजमान होणार आहेत.
या सोहळ्यासाठी देशभरातील नामवंत दिग्गज, खेळाडू, कलाकार, उद्योजक उपस्थित राहणार आहेत. याच पार्श्वभूमीवर काही सेलिब्रिटी या सोहळ्याच्या पूर्वसंध्येलाच, रविवारी अयोध्येत दाखल झाले. तर काही बॉलिवूड कलाकारांनी पहाटेच अयोध्येच्या दिशेने प्रस्थान केलं आहे.
‘या’ स्टार्सचे अयोध्येला प्रस्थान-
यात अभिनेता विकी कौशल आणि कॅटरिना कैफ, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट, रणदीप हुड्डा व त्याची पत्नी लीन तसेच माधुरी दीक्षित व तिचे पती श्रीराम नेने यांचा समावेश आहे. यासर्व जोडप्याने पहाटेच पारंपरिक वेशभूषेत अयोध्येकडे प्रस्थान केले. कॅटरिनाने गोल्डन रंगाची सुंदर साडी परिधान केली होती. तर, आलियानेही निळ्या रानगची साडी घातली होती.
View this post on Instagram
विकी कौशल आणि रणबीर कपूरने धोती- कुर्ता घातला आहे. याचे फोटो सोशल मिडियावर आता प्रचंड व्हायरल होत आहेत. यासोबतच बॉलिवूडचे बिग-बी अर्थात अमिताभ बच्चनदेखील पहाटेच सोहळ्यासाठी रवाना झाले आहेत.
View this post on Instagram
त्यातच माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरही अयोध्येला जाण्यापूर्वी विमानतळावर दिसून आला. सुनील गावस्कर ,सचिन तेंडुलकर यांच्यासह अनेक खेळाडूंना निमंत्रण देण्यात आलं आहे. तर अनिल कुंबळेही कालच अयोध्येत (Ram Mandir Inauguration Day) पोहोचले आहेत.
अयोध्येत उत्साहाचे वातावरण-
आज दुपारी साडे बारा वाजता (Ram Mandir Inauguration Day) या सोहळ्याला सुरुवात होणार आहे. 16 जानेवारीपासूनच प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमांना सुरुवात झाली होती. या ऐतिहासिक सोहळ्यात फक्त देशभरातून नाही तर विदेशातूनदेखील आमंत्रण देण्यात आले आहे. आज 50 देशांचे प्रतिनिधी या समारंभास उपस्थित असणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी या सोहळ्याला संबोधित करणार आहेत. प्रभू रामाच्या स्वागतासाठी संपूर्ण अयोध्या नगरी सजली आहे. सगळीकडे उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे.
News Title- Ram Mandir Inauguration Day
महत्त्वाच्या बातम्या –
Mira Road Riots | सनातन यात्रेवर हल्ला! श्री रामाचे झेंडे फाडले; तणावानंतर मोठा पोलीस बंदोबस्त
Ram Mandir | प्राण प्रतिष्ठा कार्यक्रम अन् ‘दिवाळी’! बाजारात 1 लाख कोटींहून अधिकची उलाढाल
“तो आमच्या जमान्यात असता तर…”, Shoaib Akhtar ला विराटच्या क्षमतेवर शंका
Ram Mandir | स्वप्नपूर्ती! साक्षात रामलला आज घरी आले; बाळाला जन्म दिलेल्या महिलांची भावना
Virat Kohli ची अयोध्येत एन्ट्री! रस्त्यावर जमली एकच गर्दी, Video Viral