गायक Rahat Fateh Ali Khan यांच्याकडून नोकराला मारहाण, व्हिडीओ तूफान व्हायरल

मुंबई | पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खानबद्दल (Rahat Fateh Ali Khan) एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ट्विटरवर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये राहत आपल्या नोकराला चप्पलने मारहाण करताना दिसत आहे.

Rahat Fateh Ali Khan यांच्याकडून नोकराला मारहाण

टेबलावर ठेवलेली दारूची बाटली कुठे गेली? असं ते नोकराला विचारत आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. पाकिस्तानसह भारतात या व्हिडीओची सध्या जोरदार चर्चा आहे.

आधी त्यांनी नोकराचे केस पकडले. त्यानंतर चपलेने त्यांनी नोकराला जबर मारहाण केली. चपलेने त्यांनी नोकराच्या डोक्यात मारलं. यावेळी नोकर घाबरल्याचं दिसलं. तो घाबरून लांब- लांब जाऊ लागला. पण मग राहत फतेह अली खान त्याच्या जवळ जातात. पुन्हा त्याला विचारतात की, टेबलावरची दारूची बॉटल कुठे गेली?

हा व्हिडीओ पाहून सगळेच चकीत झाले. आधी हा व्हिडीओ खोटा असल्याचा दावा करण्यात आला होता, तर हा व्हिडीओ खरा असून व्हिडीओत दिसणारे राहत फतेह अली खान हेच आहेत. या सगळ्या प्रकारावर आता त्यांनी स्पष्टीकरणही दिलं आहे.

Rahat Fateh Ali Khan ” तो माझ्या मुलासारखा आहे”

राहत फतेह अली खान म्हणाले, हे उस्ताद आणि शागिर्द यांच्यातील वैयक्तिक गोष्ट आहे. तो माझ्या मुलासारखा आहे. शिक्षक आणि त्याच्या शिष्याचे नाते असेच असते. जर एखाद्या शिष्याने काही चांगलं केलं तर मी त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करतो. त्याने चुकीचे काही केले आहे, त्याला शिक्षा झाली आहे.

स्पष्टीकरण दिलेल्या व्हिडीओमध्ये, मारहाण झालेल्या व्यक्तीने कबूल केलं की त्याने पवित्र पाण्याची बाटली हरवली होती. ज्यामुळे ही घटना घडली, परंतु त्यांच्या कृतीमागे कोणताही वाईट हेतू नव्हता. ते माझ्या वडिलांसारखे आहेत. ते आमच्यावर खूप प्रेम करतात.

महत्त्वाच्या बातम्या- 

लाईव्ह सामन्यात Babar Azam चा संयम सुटला; अम्पायरच्या मध्यस्थीने वाद मिटला, video viral

PWD Department | नोकरीसाठी जात बदलली! बड्या अधिकाऱ्यांसह 136 जण रडारवर

लेक प्रसिद्धीच्या शिखरावर अन् ‘बापमाणूस’ जमिनीवर; Rinku Singh च्या वडिलांचा भावनिक video

14 वर्षापूर्वी मित्राचं ऐकलं असतं तर आज पश्चात्ताप झाला नसता; Sania Mirza चं मोठं विधान

“सरकार पाडण्यासाठी ‘आप’च्या आमदारांना 25 कोटींची ऑफर”, Arvind Kejriwal यांचा गौप्यस्फोट