‘दोन-चार महिन्यात शिंदे..’, संजय राऊतांचा खळबळजनक दावा

Sanjay Raut | लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान शुक्रवारी पार पडेल. त्यापूर्वीच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधत गंभीर आरोप केले आहेत. तसंच एक मोठा दावाही यावेळी त्यांनी केलाय.

महाराष्ट्रात आम्ही 35 पेक्षा जास्त जागा जिंकू आणि विदर्भात सर्वाधिक जागा जिंकू. विदर्भात समतोलपद्धतीने जागा वाटप केलं आहे. मुंबईचं जागा वाटप झालं आहे, आता आम्ही कोणताही विचार करत नाही. एकदा उमेदवार दिल्यावर मागे घेण्याची परंपरा नाही, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

भाजपवर गंभीर आरोप

यावेळी त्यांनी शिंदे गटावरही निशाणा साधला.’भाजप जेव्हा शिवसेना गिळायला लागली तेव्हा आम्ही बाहेर पडलो. भाजपचं धोरण म्हणजे वापरा आणि फेकून द्या. पुढील दोन- चार महिन्यात शिंदे गट दिसणार नाही’, असा दावा करत राऊत यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. ते आज (18 एप्रिल) माध्यमांशी संवाद साधत होते.

राऊतांचं मोदींना आव्हान

‘राहुल गांधी यांनी ज्या ज्या भूमिका मांडल्या त्या खऱ्या झाल्या आहेत. 400 पार ही मोदींची घोषणा एका भयातून निर्माण झालीये. लोकांना भिकेला लावून गुलाम केलंय. पुलवामासारखं प्रकरण राजकारणासाठी केलं आणि लोकांना भावनिक केलं जातं आहे. त्यामुळे त्यांची निवडून येण्याची शक्यता नाही. मोदींनी वाराणसीमधून निवडून येऊन दाखवावं.’, असं आव्हानच यावेळी संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिलं.

‘कोरोनामध्ये गो कोरोना जसं म्हटलं तसंच आता गो मोदी गो करत लोक थाळ्या वाजवत आहेत. 400 पार ही घोषणा दूर मोदी 150 जागा सुद्धा जिंकणार नाहीत’, असंही राऊत म्हणाले आहेत. त्यांचं हे वक्तव्य आता चर्चेत आलं आहे.

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी देखील मोदी यांच्याविरोधात संतापाची लाट असल्याचं म्हटलंय. काही दिवसांपूर्वी देशात भाजप 180 जागा जिंकेल असं वाटत होतं. पण आता ते फक्त 150 जागापर्यंतच मजल मारतील, असं चित्र आहे. आम्हाला प्रत्येक राज्यातून अहवाल मिळत आहेत की, आमची स्थिती मजबूत होत आहे आणि ‘इंडिया’च्या बाजूने एक छुपी लाट आहे, असा दावा यावेळी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केला. त्यांच्यानंतर राऊत यांनीही हेच बोलून दाखवलं.

News Title:  Sanjay Raut on eknath shinde and modi

महत्त्वाच्या बातम्या-

पुढील 5 ते 7 दिवस… हवामान विभागाकडून महाराष्ट्रातील ‘या’ भागांना पावसाचा इशारा

घरी आलेल्या मैत्रिणीला दिलं गुंगीचं औषध आणि त्यानंतर मैत्रिणीच्या भावानेच…

अवघी 4 गुंठे जमीन आणि रहायला झोपडी!, शेतकऱ्याच्या मुलानं UPSC परीक्षेत मारली बाजी

सुजय विखे 5 वर्षे फिरकलेच नाहीत!, भाजपच्या 100 कार्यकर्त्यांनी राजीनामे दिल्याने अहमदनगरमध्ये खळबळ

PF खात्यातून पैसे काढणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी