…अन् रागाच्या भरात त्यानं कंडोम गिळलं

नवी दिल्ली | ‘अती राग भीक माग’ ही म्हण आपल्याला माहित आहे. अनेकदा अती रागात(very angry) माणूस असं काही करुन बसतो की नंतर त्याचा त्याला प्रचंड त्रास सहन करावा लागतो. याचाच प्रत्यय एका घटनेवरुन आला आहे. अमेरिकेतील एका व्यक्तीनं रागाच्या भरात असं पाऊल उचललं की त्यामुळं सगळ्यांनाच धक्का बसला आहे.

अमेरिकेतील (America) एका व्यक्तीनं रागाच्या भरात केळीला कंडोम(Condom) लावलं आणि ते तसंच खाल्लं. त्यानंतर त्या व्यक्तीला याची काहीच कल्पना नव्हती की यामुळे इतकं भयंकर काही होईल. कंडोम लावलेलं केळ खाल्यानंतर त्या व्यक्तीला थोड्याच वेळात प्रचंड त्रास व्हायला लागला.

काही खाता-पिता येईनासं झालं. प्रचंड उलट्या होऊ लागल्या. त्यामुळं घरच्यांनी त्या व्यक्तीला दवाखान्यात नेलं. त्याची दुखण्याची तीव्रता पाहून डाॅक्टरांनी लगेच सीटी स्कॅन (CT scan) केलं. आलेला रिपोर्ट पाहून डाॅक्टरदेखील चक्रावले. या व्यक्तीच्या आतड्याजवळ कंडोममध्ये गुंडाळलेलं केळ त्यांना दिसून आलं. त्यानंतर डाॅक्टरांनी विचारविनिमय करुन ऑपरेशन केलं

जवळपास एक तास त्या रुग्णावर शस्त्रक्रिया(Surgery) सुरु होती. रुग्ण आता व्यवस्थित आहे. डाॅक्टरांनी सांगितलं की, केळी कंडोममध्ये असल्यानं फुटू शकत नव्हती. आतड्यात ते पचणं कठीण होतं. त्यामुळं रुग्णाला त्रास होत होता. याविषयी संपूर्ण माहिती घेऊनच डाॅक्टरांनी याविषयीचा लेख क्युरियस मॅगझीनमध्ये (Curious Magazine) प्रकाशित केला.

महत्त्वाच्या बातम्या

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More