मुंबई | संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही महाराष्ट्राची भूमी आहे. संतांपासून महाराष्ट्राला शाश्वत आणि संस्कारक्षम मूल्यांचा खजिना मिळाला. पण याच संतांबद्दल जर कोणी चुकीचा संदर्भ दिला तर त्याला वारकरी संप्रादाय माफ करत नाही. पण बागेश्वर धाम सरकार(Bageshwar Dham Sarkar) या नावानं जगप्रसिद्ध असणाऱ्या धीरेंद्र शास्त्री(Dhirendra Shastri) यांनी थेट संत तुकाराम महाराजांबद्दलच चुकीचं वक्तव्य केल्यानं ते वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. तर बागेश्वर धाम यांनी संत तुकाराम महाराजांबद्दल नेमका काय चुकीचा संदर्भ दिलाय आणि त्यांच्या या वक्तव्यावर देहू संस्थानचे विश्वस्थ यांचं काय मत आहे?, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की पाहा. नमस्कार मी निकिता पाटील
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे स्थान अनन्य आहे. परंतु बागेश्नर महाराजांनी संत तुकाराम महाराजांबदद्ल चुकीचा संदर्भ दिल्यानं बागेश्वर धाम यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण त्यांच्या या वक्तव्यामुळं संत तुकाराम महाराज आणि त्यांच्या पत्नीच्या प्रतिमेला ठेच पोहचली आहे.
आता आपण पाहूयात की नेमके काय म्हणाले आहेत बागेश्वर महाराज. तर बागेश्वर महाराज एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, संत तुकाराम महाराष्ट्रातील एक महात्मा होते. परंतु त्यांची पत्नी त्यांना रोज काठीनं मारायची. तुकाराम महाराजांना एका व्यक्तीनं विचारलं की, तुम्ही रोज बायकोचा मार खाताय तुम्हाला लाज वाटत नाही का?, त्यावर तुकाराम महाराज म्हणाले की, मला मारहाण करणारी बायको मिळाली ही सुद्धा देवाचीची कृपा आहे. त्यावर त्या व्यक्तीनं पुन्हा विचारलं की यात कसली देवाची कृपा. त्यावर तुकाराम महाराज म्हणाले की, मला जर प्रेम करणारी बायको मिळाली असती तर मी देवाच्या प्रेमात पडलो नसतो पत्नीच्या प्रेमात पडलो असतो. मारहाण करणारी पत्नी मिळाल्यानं देव मला त्याची सेवा करण्याची संधी देतोय.
आता विशेषं बाब म्हणजे, आजपर्यंत अनेक किर्तनकारांनी, संत चरित्र्याचा अभ्यास करणाऱ्यांनी तुकारामांच्या भक्तीचे गुणगाण सांगितले. तसेच तुकाराम महाराज विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन झालेले अनेक किस्सेही प्रचलित आहेत. परंतु आजपर्यंत त्यांच्या बायकोबद्दल असा संदर्भ कोणीही दिलेला आढळलेला नाही. मग बागेश्वर धाम यांनी कशाच्या आधारावर हा संदर्भ दिला असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आता आपण देहू संस्थानाचे विश्वस्थ माणिक महाराज मोरे यांनी यावर काय प्रतिक्रिया आहे हे पाहूयात. तर माणिक महाराज मोरे यांचं म्हणनं आहे की, तुकाराम महाराजांच्या पत्नी आमच्या मातोश्री आहेत. त्यांनी तुकोबारायांना घास घातल्याशिवाय अन्नाचा कण घेतला नाही. तुकाराम महाराजांसाठी त्यांनी आयुष्यभर त्यागाची भूमिका घेतली. मग त्यांच्याबदद्ल असं वक्तव्य करणं चुकीचं आहे. वारकरी संप्रादाय सहिष्णू आहे म्हणून आम्ही त्यांमा माफ करतो.
पण बागेश्वर धाम यांनी संत तुकाराम महाराजांबद्दल असा चुकीचा संदर्भ दिल्यानं राजकीय नेते आणि सामान्य जनताही त्यांच्याबद्दल संताप व्यक्त करताना दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या-