मोठी बातमी! पाकिस्तानात नमाजाच्यावेळी मोठा स्फोट
कराची | सध्या पाकिस्तान (Pakistan) डबघाईला आला आहे. त्यामुळं सगळीकडं पाकिस्तानची चर्चा सुरु आहे. अशातच आता पाकिस्तानमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. पाकिस्तानमधील पेशावर इथं आत्मघाती हल्ला करण्यात आला आहे. हा हल्ला मस्जिदमध्ये करण्यात आला आहे.
सोमवारी दुपारच्या सुमारास हा स्फोट झाला आहे. पेशावरमधील(Peshawar) लाइन्स भागातील मशिदीत नमाजाच्यावेळी हा स्फोट झाला आहे. यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या हल्ल्यात 28 जणांचा मृत्यू झाला असून, 150 लोक जखमी आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
या घटनेनंतर आणिबाणी (Emergency) जाहीर करण्यात आली आहे. या हल्ल्यात अनेक पोलीस दलही मारले गेले आहेत. सध्या पाकिस्तानी लष्कराने परिसराला वेढा घातला आहे. घटनेचा व्हिडिओ समोर आला असून आजूबाजूला भितीचे वातावरण पसरलं आहे.
हल्ल्यानंतर मशिदीच्या इमारतीचा काही भाग पडला आहे. त्या ढिगाऱ्याखाली अनेक लोक दबल्या गेल्याची शक्यता आहे. दरम्यान, पाकिस्तानात असे हल्ले वारंवार होत असतात. 2022 ला पाकिस्तानची राजधानी कराचीमध्ये(Karachi) देखील हल्ला झाला होता.
महत्त्वाच्या बातम्या
Comments are closed.