पठाणच्या वादावरून उर्फी-कंगना एकमेकींना भिडल्या

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | शाहरूख खान(Shah Rukh Khan) आणि दीपिका पादुकोनचा(Deepika Padukone) ‘पठाण'(Pathaan) हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. चित्रपट रिलीज होऊन चित्रपटाला यश मिळत असतानाही काहींचा अजूनही या चित्रपटाला विरोध कायम आहे.

त्यातच अभिनेत्री कंगना रनौतनं(Kangana Ranaut) या वादात उडी घेतल्यानं ती चर्चेत आली आहे. कंगनानं दोन दिवसांपूर्वी ट्विट करत ज्यांनी पठाणच्या यशाबद्दल ‘द्वेषावरचा विजय’ असं म्हटलं होतं, त्यांना कंगनानं कठोर शब्दांत गंभीर इशारा दिला होता.

या देशानं फक्त खान यांच्यावरच प्रेम केलं आहे. तसेच येथील लोकांना मुस्लिम अभिनेत्रींचंच वेड आहे, अशा आशयाचं ट्विट कंगनानं केलं आहे. आता कंगनाच्या या ट्विटला उर्फी जावेदनं(Urfi Javed) उत्तर दिलं आहे.

उर्फीनं ट्विटमध्ये लिहिलं आहे की, अरे देवा, ही कसली विभागणी. हिंदू कलाकार-मुस्लिम कलाकार, कलाकार हे धर्मात विभागलेले नाहीत. इथं फक्त कलाकार आहेत.

कंगनानंही उर्फीच्या या ट्विटला रिप्लाय दिला आहे. ट्विटमध्ये कंगना म्हटली आहे की, होय प्रिय उर्फी. हे एक आदर्श जग झाले असते. परंतु समान नागरी संहिता आल्याशिवाय ते शक्य नाही. जोपर्यंत या राष्ट्राची राज्यघटनेतच विभागणी होत नाही तोपर्यंत ते विभागलेलेच राहील.

पुढं कंगनानं असंही लिहिलं आहे की, आपण सगळे मिळून समान नागरी संहितेची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडं करूयात. आता कंगना-उर्फीच्यात झालेल्या या ट्विट-रिट्विटमुळं त्या दोघीही चांगल्याच चर्चेत आल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-