अखेर राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा समारोप!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

जम्मू कशमीर |काॅंग्रेस नेते राहुल गांधी (Member Of Lok Sabha Rahul Gandhi) यांची भारत जोडो (Bharat Jodo) यात्रा संपन्न झाली आहे. कन्याकुमारीपासून सुरु झालेल्या या यात्रेत अनेक नेते मंडळी सहभागी झाले होते.

तब्बल 12 राज्य, 145 दिवस, 4 हजार 80 किमीच्या प्रवासानंतर ही यात्रा संपन्न झाली. श्रीनगरच्या शेर-ए- काश्मीर स्टेडियममध्ये जनसभा झाली. या जनसभेत राहुल गांधी, प्रियांका गांधी यांनी उपस्थितांना संबोधित केलं आहे.

भारत जोडो यात्रा 7 सप्टेंबर 2022 ला तामिळनाडूतील कन्याकुमारीमधून सुरु झाली होती. राहुल गांधी यांची वेगवेगळ्या जिलह्यात पदयात्रा सुरु असताना या यात्रेला नागरिकांनी सुद्धा मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. त्यांच्या या यात्रेत राष्ट्रवादीचे आमदार आणि नेतेसुद्धा सहभागी झाले होते.

या सोबतच बाॅलिवूड अभिनेत्री आणि निर्माती व दिग्दर्शक पूजा भट्ट (Bollywood Actress Pooja Bhatt) तसेच मराठी अभिनेत्री उर्मीला मातोंडकर (Actress Urmila Matondkar) यांनी देखील यामध्ये सहभाग घेतला होता. त्यांच्या या यात्रेत शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) हे देखील उपस्थित राहीले होते.

भारत जोडो यात्रेसाठी राजकारणात अनेक वाद सुद्धा झाले. या यात्रेचा परिणाम येणाऱ्या निवडणुकीवर होणार का? यावर सुद्धा प्रश्न उपस्थित केेले जात होते. दरम्यान या प्रश्नांवर मात करत अखेर या यात्रेचा आज समारोप होणार आहे.

थोडक्यात बातम्या-

मोठी बातमी! गायक कैलाश खेर यांच्यावर हल्ला

सीमेवर जाऊन धुणीभांडी करण्याची माझी इच्छा- चंद्रकांत पाटील

भारीच की! 10 लाखांचं उत्पन्न तरीही तुम्ही टॅक्स फ्री होऊ शकता

आता इलेक्ट्रिक अवतारात Jimny, किंमतीबाबत मोठा खुलासा

कार्यकर्त्यांचं ऐकायचं की पवारांचं? एका निर्णयानं तुटणार महाविकास आघाडी?