मुंबई | एक मोठी बातमी समोर आली आहे. अभिनेत्री राखी सावंतला (Rakhi Sawant) अटक (Arrest) करण्यात आली आहे. आंबोली पोलिसांनी ही कारवाई केली आहे. एका मॉडेलचा व्हिडीओ व्हायरल केल्याच्या आरोपाखाली राखीला अटक झाली आहे.
राखीने नेमक्या कोणत्या मॉडेलचा व्हिडीओ व्हायरल केला होता, याबद्दलची माहिती अद्याप समोर आलेली नाही. त्याचप्रमाणे तो व्हिडीओ नेमका कोणता होता, हेसुद्धा स्पष्ट नाही.
अभिनेत्री शर्लीन चोप्रानं यासंदर्भात ट्विटरवर माहिती दिली आहे. आंबोली पोलिसांनी राखी सावंतला 833/2022 क्रमांकाच्या एफआयआरप्रकरणी अटक केली आहे, असं शर्लीनेने सांगितलं.
काल राखी सावंतनं यासंदर्भात अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, तो अर्ज न्यायालयानं फेटाळला’, अशी माहिती शरलीन चोप्रानं ट्वीटमध्ये दिली आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राखी तिच्या लग्नामुळे चर्चेत आली. बॉयफ्रेंड आदिल खान दुर्रानीसोबतचे तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
महत्त्वाच्या बातम्या-