आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानची भारताला हाक
नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ५ ऑगस्ट २०१९ मध्ये कलम ३७० रद्द करून जम्मू-काश्मिरला असलेला विशेष दर्जा काढून घेतला. भारताच्या या निर्णयानंतर पाकिस्तान चांगलंच आक्रमक झालं होतं. त्यावेळी पाकिस्ताननं जागतिक व्यासपीठावरून या निर्णयाला जाहीर विरोध केला होता. त्यावेळी पाकिस्तानने त्यांच्या देशातील असलेल्या भारतीय राजदूताला देश सोडून जाण्यास सांगितले होते. तेव्हापासून भारत-पाकमधील व्यापारही मोठ्या प्रमाणात कमी झालाय. पाकिस्ताननं काश्मिरचा मुद्दा लावून धरला तर भारतानं दशहतवादाला खतपाणी घालणाऱ्या देशासोबत चर्चा नाही ही भूमिका घेतल्यानं सध्याच्या घडीला भारत-पाक मधील संवाद बंद आहे. पण आता नुकतंच पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ(Shahbaz Sharif) यांना साक्षात्कार झाल्याचे चित्र दिसतंय. कारण इतिहासात पहिल्यांदाच पाकिस्तानच्या पंतप्रधानाने भारताशी शांततेच्या मार्गाने चर्चा करायला तयार आहोत, अशी भूमिका घेतलीय. आता पाकिस्तानची सध्याची आर्थिक परिस्थीती कशी आहे आणि नमेकं शाहबाज शरीफ काय म्हणाले आहेत. याची आपण सविस्तर माहिती घेऊयात.
सध्या पाकिस्तानचा परकीय चलनसाठा गेल्या आठ वर्षातील सर्वात निच्चांकी पातळीवर आहे. पाकिस्तानच्या चलनातील घसरणही दिवसेंदिवस सुरू आहे. पाकिस्तानमधील चिकनच्या, भाजीपाल्याच्या आणि दूधाच्या दरानं उच्चांक गाठलाय. तेथे गहू प्रति किलो ५००० रूपयांनी विकला जातोय. त्यामुळं सर्वसामान्यांंवर उपासमारीची वेळ आलीय. पाकिस्तानात विजेचाही मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. एकूणच पाकिस्तानात मोठं आर्थिक संकट आलंय. त्यामुळं पाकिस्तानला आता अनेक देशांना मदतीचा हात मागावा लागत आहे. पाकिस्तानातली राजकीय परिस्थीती अस्थिर असल्यानं आर्थिक परिस्थीती बिकट होत चाललीय, असं म्हणलं जातय.
पण आर्थिक कचाट्यात सापडलेल्या या पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी मात्र आम्हाला धडा मिळालाय असं म्हणत भारताशी चर्चा करण्यास तयार असल्याचं दुबईतील अल् अरेबिया या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलंय. पुन्हा एकदा चर्चेला सुरूवात व्हावी, असा माझा नरेंद्र मोदींना संदेश आहे, काश्मीरसारखे प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिक व गंभीर चर्चेची आवश्यकता असं शरीफ यांनी म्हटलय. आम्ही तीन वेळी लढलो पण दोन्ही देशातील जनतेला गरीबी, बरोजगारीच मिळाली. नागरिकांना शिक्षण, आरोग्यसेवा, रोजगार द्यायचाय बाॅम्ब आणि शस्त्रात्रांवर तिजोरी रिती करायची नाही, असंही शरीफ यावळी म्हणालेत.
पण बघा असं असलं तरी शरीफ यांनी ३७० चा आग्रह कायम ठेवलाय. काश्मिरला स्वायत्तता देणारे ३७० कलम पुन्हा लागू केले तरच भारतासोबत चर्चा होऊ शकते, अशी स्पष्ट भूमिका शरीफ यांनी घेतलीय, असं पाकिस्तानच्या पीएमओने केलेल्या ट्विटमध्ये आहे.
आता शरीफ यांनी भारताशी चर्चा करायला तयार आहोत, असं दाखवून दिलंय खर पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर काय निर्णय घेतील याकडं जगाचं लक्ष लागलंय.
महत्वाच्या बातम्या-
Comments are closed.