मोदींची नवी खेळी; ‘या’ नेत्याला मिळणार मोठी संधी

नवी दिल्ली | गुजरातमध्ये भाजपला (Bjp) दणदणीत विजय मिळवून देणारे सीआर पाटील (C R Patil) यांचं पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतही कौतुक करण्यात आलं. राष्ट्रीय कार्यकारिणीनंतर त्यांना उत्तर प्रदेशचे प्रभारी बनवलं जाईल, अशी अटकळ बांधली जात आहे.

उत्तर प्रदेश 2024 च्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असल्याचं बोललं जात आहे. अशा स्थितीत पाटील यांच्याकडे तिकडे जबाबदारी दिली जाऊ शकते, पण उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्यासारखे कणखर नेतृत्व असताना ते तिकडे जाण्याची शक्यता कमीच आहे.

भाजपचा कोणताही प्रदेशाध्यक्ष दुसऱ्या राज्याचा प्रभारी नाही. अशा स्थितीत पाटील यांना बढती देण्यापूर्वी पक्षाला त्यांच्या वारसाचा शोध घ्यावा लागणार आहे. त्यानंतरच पक्ष त्यांना नवी जबाबदारी देईल असं बोललं जात आहे. त्यासाठी गुजरात राज्य कार्यकारिणीच्या बैठकीची वाट पाहावी लागणार आहे.

राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीनंतर आता राज्यांची कार्यकारिणी होणार आहे. यामध्ये राज्यातील संघटनेशी संबंधित निर्णय घेण्यात येणार आहेत. गुजरातच्या राज्य कार्यकारिणीची बैठक गेल्या वर्षी जुलै महिन्यात सुरत येथे झाली होती.

दरम्यान, यूपी भाजपचे प्रदेश सरचिटणीस अश्वनी त्यागी यांना पदोन्नती देण्याचा विचार पक्ष करत आहे. त्यानाही राष्ट्रीय संघात स्थान मिळणार असल्याचे बोलले जाते. या दिग्गज नेत्यांशिवाय भाजपचे खासदार कमलेश पासवान यांनाही गोरखपूरमधील बनसगाव लोकसभा मतदारसंघातून बढती मिळण्याची शक्यता आहे. बनसगावच्या खासदारालाही राष्ट्रीय संघात स्थान मिळू शकते. 

महत्त्वाच्या बातम्या-