“मित्र म्हणतील चला टाकू,पण तुम्ही जाऊ नका”

बारामती | बारामतीत (Baramati) आरोग्य शिबिराचं उद्घाटन पवार यांच्या हस्ते झालं. यावेळी अजित पवारांनी (Ajit Pawar) अनेक महत्त्वाचे सल्ले दिले.

आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. आरोग्याची काळजी घेण्यासाठी डॉक्टर आपणास सांगतात. आपणही काळजी घेतली पाहिजे, असं अजित पवार म्हणालेत.

आपणही व्यसनाधीन होता कामा नये. नाहीतर पी दारू, खा गुटखा, रोज तंबाखू बिडी, सिगारेट पिणे म्हणजे स्वत: आपल्या शरीराचा नाश करणे आहे. कितीही आनंद झाला तरी सेलिब्रेशन म्हणून टाकू, असंही त्यांनी म्हटलंय.

कितीही आनंद झाला तरी सेलिब्रेशन म्हणून टाकू असे नको. मुला-मुलींकडे लक्ष देऊन व्यसनापासून लांब राहिलं पाहिजे, असा मोल्लाचा सल्ला शिबिरात आलेल्या रुग्णांना अजित पवार यांनी दिला आहे.

दरम्यान, मी परदेशात गेला होतो. त्यावेळी मला डोळ्याला काही तरी झाल्याचे वाटलं. परंतु दुर्लक्ष झालं. पुन्हा मी मंत्रालयात बसलो असताना डोळ्यात खूपू लागलं. मी सरळ गाडी काढली आणि डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टरांनी मला तपासले आणि सांगितले डोळ्यात रेटीनाचा प्रॉब्लेम आहे. ऑपरेशन करावं लागलं, असं अजित पवारांनी सांगितलंय.

महत्त्वाच्या बातम्या-