नरेंद्र मोदींच्या दौऱ्यामुळे मुंबईतील वाहतुकीत करण्यात आले ‘हे’ मोठे बदल!

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज मुंबईच्या दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन करण्यात येणार आहे. तसेच काही विकास कामांचं लोकार्पणही करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने मुंबईत एका विराट सभेचं आयोजन करण्यात आलं आहे.

पंतप्रधान मोदी हे मुंबईत एक रोड शो सुद्धा करणार आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत काही वाहतूक बदलही करण्यात आले आहेत.

गुरुवारी दुपारी 12 ते रात्री 9 वाजेपर्यंत पश्चिम उपनगरातील पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि सर्व रस्त्यांवरील अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. यातून रुग्णवाहिका, शाळेच्या बस आणि इतर बस वगळण्यात आल्या आहेत.

मोदी यावेळी काय बोलतात याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करून मी मुंबईत असेन, असं ट्विट करून आजच्या दौऱ्याची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे.

दरम्यान, मुंबईतील बीकेसी मैदानावर आज दुपारी 4 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विराट सभा पार पडणार आहे. यावेळी मोदी विविध विकासकामांचं भूमिपूजन करणार आहेत. तसेच महाराष्ट्रातील जनतेला संबोधित करणार आहेत. त्यामुळे मोदींच्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More