तांबेंच्या विजयामागे अजित पवार?; ‘या’ गोष्टीमुळे चर्चांना उधाण

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

मुंबई | महाराष्ट्रात पुन्हा एकदा नाट्यमय घडामोडी घडत असल्याचं पहायला मिळत आहे. हा वाद पदवीधर मतदारसंघाच्या विधानपरिषदेच्या निवडणुकीपासून सुरु झाला आहे. यामुळे काँग्रेसमध्ये (Congress) काहीच अलबेल नसल्याच्या चर्चा सुरु आहेत. सत्यजित तांबे यांच्या विजयामागे राष्ट्रवादी काँग्रेसचा हात आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

एका गोष्टीमुळे या चर्चेला उधाण आलं आहे. पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत सत्यजीत तांबेंचा (Satyajit Tambe) विजय झाला. यावेळी सत्यजीत तांबे यांचा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी एक गोष्ट घडली ज्यामुळं चर्चेला उत आला आहे. सत्यजित तांबेचा शपथविधी सुरु असतानाच सभागृहात एकच वादा…अजित दादा अश्या घोषणा देण्यात आल्या. यामुळे उपस्थिताच्या भुवया उंचवल्या.

सत्यजित तांबेनीं अपक्ष फार्म दिल्यानंतर भाजपशी जवळीक वाढल्याची चर्चा होती. दुसरीकडे मात्र तांबेंच्या विजयाला राष्ट्रवादी (Nationalist Congress) काँग्रेसनं देखील जोर लावला होता. तांबेनी इतकं करुनदेखील निवडणुकीसाठी काँग्रेसनं तांबेनां पाठिंबा द्यावा असं मतदेखील अजित पवारांनी व्यक्त केलं होतं.

नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात याच्यामध्ये देखील वाद झाल्याचं दिसून आलं आहे. याघटनेमुळं तांबेंच्या विजयामागे अजित पवार (Ajit Pawar) आहेत का असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान, या शपथविधीवेळी पवारांच्या नावाच्या घोषणा झाल्यानं चर्चाणा उधाण आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe